कोण आहे अनिकेत जाधव? मिळाले २ कोटी ३५ लाखांचे मानधन


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपल्या दमदार आणि चमकदार खेळीने फुटबॉल खेळात नाव गाजविलेल्या कोल्हापूरच्या अनिकेत जाधवला नामांकित इस्ट बंगाल फुटबॉल क्लबने करारबद्ध केले आहे. यासाठी त्याला तब्बल दोन कोटी ३५ लाखाचे मानधन मिळणार असल्याने एवढी मोठी रक्कम घेणारा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉल खेळाडू ठरला आहे.

अनिकेत जाधव हा काही वर्षापूर्वी १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत चांगलाच चमकला. तेथे त्याने अतिशय चांगली खेळी केल्याने मोठी शाबासकी मिळाली. त्यामुळे त्याची भारतीय फुटबॉल संघाने ऑरेंज संघात निवड केली. त्यांची दमदार खेळी पाहून जमशेदपूर फुटबॉल क्लब तसेच जर्मनीतील ब्लॅक बर्ग रोव्हर्सने करारबद्ध् केले.

वाचा- Asia Cup 2022: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा या तारखेला होणार; पाहा कोणाला मिळणार संधी

अनिकेतने प्रत्येक ठिकाणी जोरदार खेळी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची हैद्राबाद फुटबॉल संघाने करारबद्ध केले. आता तर थेट देशातील अतिशय नामांकित असणाऱ्या इस्ट बंगाल क्लबने त्याला करारबद्ध केल्याने अनिकेतला मोठी संधी मिळाली आहे.

वाचा- CWG 2022, 8th Day, Live: साक्षी, अंशु, बजरंग आणि दीपक अंतिम फेरीत; सर्वांनी पदक निश्चितSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: