तालुका विधी सेवा समिती व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीर

  • तारापूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न                                       

पंढरपूर /उमाका,05/08/2022 :- तालुका विधी सेवा समिती व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच बालकांचे संरक्षण कायदा या विषयावर  गंगाई सपाटे विद्यालय, तारापूर ता.पंढरपूर येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पंढरपूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश एस.एच.इनामदार, न्यायाधिश एम.आर.कामत, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.भगवान मुळे, ॲड.यु.सी.बागल,ॲड.कारंडे,ॲड.सौ कोष्टी,विद्यालयाचे प्राचार्य आदी उपस्थित होते.

सदर शिबीरात न्यायाधिश एस.एच.इनामदार यांनी कायदेविषयक मार्गदर्शन, न्यायाधीश एम. आर.कामत यांनी मुलांचे मुलभूत कर्तव्ये,ॲड. सौ.कोष्टी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ तर ॲड.यु.सी.बागल यांनी लहान मुलांचे अधिकार व पोक्सो कायद्याविषयी प्रशालेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष भगवान मुळे यांनी केले. सूत्रसंचलन राहुल बोडके यांनी केले. आभार प्रदर्शन एम.एम.नाईकनवरे यांनी केले.या कार्यक्रमास विधीज्ञ,तारापूरचे ग्रामसेवक, ग्रामस्थ,विद्यार्थी, शिक्षक -शिक्षीका,शिक्षकेतर कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: