उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची बिर्याणी पार्टी, एनआयएचा कोर्टात मोठा दावा
अमरावतीचे व्हेटर्नरी मेडिसिन व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली होती. याबाबत वेगवेगळे खुलासे सातत्याने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी एनआयएचे एक पथक अमरावती शहरात दाखल झाले या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. जून महिन्यात उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
Gold Medal For India…बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक कामगिरी
न्यायालयाच्या चेंबरमध्ये प्रसारमाध्यमांना परवानगी नव्हती मात्र दोन आरोपींसाठी उपस्थित असलेले वकील अली काशिफ खान माहिती देताना म्हणाले की, एनआयएने न्यायालयात सांगितलं की उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी बिर्याणी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत कोण कोण होतं याचा तपास करणं आवश्यक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं.
हे गाणं ऐकल्यावर मला उद्धव ठाकरेंचा चेहरा आठवला- अमृता फडणवीस
एनआयए ने हा देखील आरोप केला आहे की यातला एक आरोपी अरबाझने उमेश कोल्हे यांच्यावर आणि त्यांच्या घरावर तसंच त्यांच्या मेडिकलवर लक्ष ठेवलं होतं. इतर आऱोपींना पळून जाण्यास आणि लपण्यास त्याने मदत केली होती असंही NIA ने कोर्टात सांगितलं. एनआयएने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी 7 आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना या आरोपींनी नेमकं काय केलं आहे याचा शोध लागला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० कोटी द्या, अन्यथा जिल्हाबंदी करू; शिवसेनेचा इशारा