तरुणांना २० व्या वर्षानंतर लोकसभा लढवू द्या, असदुद्दीन ओवसींचं संसदेत खासगी विधेयक


नवी दिल्ली : एमआयएचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी २० वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना लोकसभा निवडणुकीला उभं राहण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारं खासगी विधेयक सादर केलं आहे. असदुद्दीन ओवेसींच्या मतानुसार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २० वर्ष पूर्ण असलेल्या तरुणाला परवानगी देण्यात यावी. तर, विधानपरिषद सदस्य बननण्यासाठी ती अट २२ वर्षे तर राज्यसभा खासदार बननण्यासाठी ती अट २५ वर्ष करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक खासगी विधेयक सादर केलं आहे. त्यानुसार देशभरात विविध निवडणुकांसाठी वेगवगेळ्या वयोमर्यादा आहेत. वयोमर्यादा कमी करुन युवकांना संधी दिली जावी, अशी ओवेसी यांची मागणी आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २० वर्ष पूर्ण ही अट असावी अशी मागणी केली आहे.

Gold Medal For India…बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

आपल्या देशातील ५३ टक्के लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. मात्र, तरी देखील त्यांना राजकीय यंत्रणेपासून बाहेर ठेवत आलो आहोत. असदुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात लोकसभेत खासगी विधेयक सादर केलं आहे. त्यानुसार लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभा निवडणूक बनण्यासाठीची वयोमर्यादा कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकसभेसाठी २० वर्ष पूर्ण, राज्यसभेसाठी २५ आणि विधानपरिषदेसाठी २२ वर्ष पूर्ण असावीत, अशी अट असली पाहिजे, असं ओवेसी यांनी लोकसभेत मांडलं. ओवेसी यांनी याबाबत एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.
कुस्तीमध्ये भारताला सलग दुसरे सुवर्णपदक, बजरंगनंतर साक्षी मलिकने मारली बाजी

भाजपचा विरोध
भारतीय जनता पार्टींनं असदुद्दीन ओवेसींच्या खासगी विधेयकाला विरोध केला आहे. यावरुन ओवेसींनी देखील भाजप खासदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. युवा खासदारांची पार्टी म्हणून घेणाऱ्या पक्षाचा या विधेयकाला विरोध का?, असा प्रश्न ओवेसींनी केला.

गोल्डमेडलची हॅट्रिक… पाकिस्तानच्या इनामला नमवत दीपक पुनियाचे ऐतिहासिक सुवर्णपदकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: