फटाके, फुलांचा वर्षाव, बोनेटवर चढून स्टंटबाजी; कोल्हापुरात आरोपीचं झालं असं जंगी स्वागत!


कोल्हापूर : ‘शंभर कोटी रुपये द्या, तुम्हाला मंत्रीपद देतो’, असे आमिष दाखवून आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिरोली येथील रियाज शेख याची जामीनावर सुटका होताच त्याने स्टंट केला आहे. तो शिरोलीत येताच फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत त्याचे स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोल्हापुरात त्याच्या या स्टंटची चर्चा सुरू आहे. (a warm welcome to the suspected accused in mla cheating case in kolhapur)

आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून चौघांनी तब्बल १०० कोटी रुपयांची मागणी माजी आमदार राहुल कुल यांच्याकडे केली होती. कुल यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुबंई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील रियाज शेख याच्यासह एकूण चौघांना अटक केली होती. पुढे रियाज शेख याला जामीन मिळाला.

मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहण्याचे वचन देणाऱ्या १४० जणांचा सत्कार; उद्धव ठाकरेंना रक्ताने…
शिरोळ्यात शेखचे जंगी स्वागत

जामिनावर सुटल्यानंतर रियाजने शिरोली प्रवेश केला. यावेळी त्याचे फटाके फोडून आणि त्याच्यावर फुले उधळून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या जंगी स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रियाज शेख हा या प्रकरणातील संशयित आयोपी आहे. तो संशयित असला तरी देखील अशा प्रकारे स्टंट करणे कितपत योग्य आहे असे म्हणत कोल्हापुरात आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. ‘I AM BACK, KINGS KING’ असे या व्हायरल व्हिडिओत लिहिल्याचे दिसत आहे.

संभाजीराजे मैदानात, ९ ऑगस्ट पासून परिवर्तन यात्रा, राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघणार
फसवणुकी प्रकरणी पाच जणांवर कारवाई

रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१) योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७) सागर विकास संगवई (वय ३७) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३) या आरोपांना अटक करण्यात आली होता. दौंडचे आमदार राहुल कुल आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी हा डाव उधळून लावला होता. रियाज शेख हा कोल्हापूरचा असून, योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई हे ठाण्याचे, तर जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी हा मुंबईतील नागपाडा येथील आहे.

‘हेरवाड’चं पुन्हा क्रांतिकारी पाऊल, विधवांना देणार २५ हजाराची मदत
राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच मंत्रिपद मिळेल असे अनेक आमदारांना वाटत होते. याचाच फायदा घेत राज्यातील काही आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जर कॅबिनेट मंत्रिपद हवे असेल तर १०० कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात येत होती. या प्रकरणी जुलै महिन्यात कोल्हापुरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांना अटक केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: