माणुसकीला काळीमा फासणारी घटना! अतिशय धक्कादायक; २ दिवसीय मृत अर्भक लेंडी नाल्यात सापडलं


अक्षय गवळी, अकोला

माणुसकीला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या देवरी गावामध्ये समोर आली आहे. ही घटना जाणून तुम्हाला मोठा धक्का बसेल आणि संताप देखील येईल. देवरी गावातील लेंडी नाल्यात दोन ते तिन दिवसाचं मृतक अर्भक टाकून दिलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत नाल्यात टाकून देण्यात आलेल्या अर्भक हे पुरुष जातीचे आहे. दहिहंडा पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, हे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (A 2-day-old dead infant was found at Lendi Nala in Akola)

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अकोट तालुक्यातल्या देवरी गावातील लेंडी नाल्यात मृतक अर्भक सापडल आहे. याची माहिती गावकऱ्यांनी दहीहंडी पोलिसांना देतात त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, हे मृतक अर्भक पुरुष जातीचं असून सुमारे दोन ते तीन दिवसाचे असल्याचं समजते.

क्लिक करा आणि वाचा- ‘असले’ जुगाड पाहून पोलीस चक्रावले; स्कुटीची बनवली सायकल; घरगुती गॅसवर चालतात बाईक

पोलिसांनी हे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नाल्यामध्ये अर्भक टाकून दिले. मात्र या अर्भकाकडे कोणाचंही लक्ष गेले नाही. आज सायंकाळी काही गावकऱ्यांचा याकडे लक्ष गेलं. या अर्भकाला मुंग्या आणि माशा लागल्या होत्या. या अर्भकाला नाल्यात नेमके कुणी टाकले, याचाही तपास दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत करीत आहे. तसेच या अर्भकास असे बेवारसपणे सोडणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- गर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार; २३ वर्षाच्या युवकाने केलं भयानक कृत्य

अनैतिक संबंध लपवणे हे असावे कारण

हे अर्भक अनैतिक संबंधातून असावे आणि हे संबंध लपवण्यासाठी संबंधित महिलेने हे अर्भक या लेंडी नाल्यात फेकून दिले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दहिहंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘सेठजीला खूप वर्षांनी मुल झालं…’; अकोल्यात वृद्ध महिलांना लुटण्यासाठी चोरट्यांचा अनोखा फंडाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: