लढली… हरली… अन् रडायलाच लागली… अंशु मलिकला रौप्यपदक, फक्त दोन गुणांनी सुवर्ण हुकले


बर्मिंगहम : भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिकने आज रौप्यपदकाची कमाई केली. अंशु ही राष्ट्रकुलमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली कुस्तीपटू ठरली आहे. अंशुचे सुवर्णपदक यावेळी फक्त दोन गुणांनी हुकले. तिला अंतिम फेरीत ४-६ असा पराभव पत्करावा लागला.

आज दिवसभरात धडाकेबाज कामगिरी करत अंशुने अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिची गाठ ओडुनायो फोलसाडे अडेकुरोयेबरोबर होती. अंशू मलिकने येथे सुरुवातीला ती थोडी बचावात्मक दिसत होती. त्यामुळे तिला सुरुवातीचा गुण कमावता आले नाही. पण या गोष्टीचा चांगलाच फायदा नायजेरियन कुस्तीपटूने उचलला आणि सामन्यात २-० अशी आघाडी घेतली होती. सुरुवातीलाच अंशुने सामन्यावरची पकड गमावली. त्यामुळे तिला पुढच्या खेळात जास्त आक्रमकपणे खेळ करता येणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण तिने त्यानंतर चार गुणांची कमाई केली. पण प्रतिस्पर्धी खेळाडूने अनुभव पणाला लावत सहा गुण पटकावले आणि त्यामुळेच अंशुला या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: