मुंबईत कुठे आहे मेगाब्लॉक?, मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी…


म. टा. प्रतिनिधी, मुंबईः माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल-वाशी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. वसई रोड यार्डासाठी दिवा मार्गावर आज, शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी, ठाणे-वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

स्थानक – माटुंगा ते मुलुंड

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल-ठाणे दरम्यानच्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्यादेखील रद्द राहतील. सीएसएमटी-वाशी, ठाणे-वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

वसई रोड यार्डावरील दिवा मार्गिकेवर आज, शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते ३.१५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: