आरोपींच्या मुसक्या आवळा, सोडू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भंडारा अत्याचाराची गंभीर दखलमुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.

महाराष्ट्र पुन्हा हादरला; मदतीच्या बहाण्याने एकाच महिलेवर दोन जिल्ह्यात सामूहिक बलात्कार, पीडिता गंभीर
नेमकं काय घडलं होतं?

-पतीसोबत विभक्त झालेली ३५ वर्षीय महिला गोंदियात बहिणीकडे आली होती
-तिथे बहिणीशी भांडण झाल्याने ३० जुलै रोजी रात्री ती आईकडे जाण्यासाठी निघाली
-वाटेत आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं
-आरोपीकडून महिलेला गोंदियाच्या मुंडिपार जंगलात नेऊन पाशवी अत्याचार
-दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी पळसगाव जंगलात नेऊन पुन्हा अत्याचार, तिला जंगलातच सोडून पलायन
-पीडित महिला जंगलातूनच भंडाऱ्यातील कन्हाळमोह गावात पोहोचली, तिथं दुचाकी दुरुस्त करणाऱ्याशी भेट
-घरी सोडण्याच्या बहाण्यानं दुसरा आरोपी आणि त्याच्या मित्राकडून १ ऑगस्ट रोजी महिलेवर पुन्हा बलात्कार
-पीडित महिलेला कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींचा पळ
-पीडितेला पाहिल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, रुग्णालयात महिलेवर उपचार

अत्याचार करुन विवस्त्र अवस्थेत जंगलात फेकले; रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती पीडिता
पोलिसांकडून आरोपींना बेड्या

दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा भयंकर घटना भंडारा जिल्ह्यातली आहे. मदतीच्या बहाण्याने एकाच महिलेवर दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कन्हाळमोह परिसरात ४५ वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला आहे. महिलेची प्रकृती अत्यंत बिकट असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अत्याचार पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. ३० जुलै रोजी घरगुती वादातून ती घराबाहेर पडली. माहेरी जाण्यासाठी निघाली असता वाटेत श्रीराम उरकुडे (वय ४५, रा. गोरेगाव) हा मिळाला. त्याने तिला गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथे नेऊन अत्याचार केला. नंतरही ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले. ती भटकत असताना १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तेव्हा एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन देतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिला शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला. २ ऑगस्ट रोजी सकाळी सदर महिला विवस्त्र अवस्थेत शेतात आढळली.

अत्याचारानंतर रात्रभर पीडिता तशीच पडून होती. अत्याचारामुळं तिने शुद्ध गमावली होती. कन्हाडमोह येथे रात्रभर पीडिता वेदनेने विव्हळत होती त्याचवेळी गावातील तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. गावकरीही तिच्या मदतीसाठी धावले. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. महिला विवस्त्र होती व वेदनेने कण्हत होती. पोटापासून पायापर्यंत रक्ताने शरीर माखले होते. प्रचंड रक्तस्त्रावामुळं महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी गंभीर जखमा केल्या आहेत. त्यामुळं पीडितेच्या गर्भाशयापर्यंत जखम झाली आहे.

कारधा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. चौकशीअंती महिलेवर गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि पळसगाव मार्गावर एकाने आणि भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरात दोघांनी अत्याचार केल्याचे पुढे आले. कारधा आणि लाखनी पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध चमू बनवून आरोपींचा शोध घेतला. नंतर दोघांना अटक करण्यात आली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: