जन्मदात्यांनीच नवजात मुलीला जिवंत पुरलं, पण चमत्कार घडला अन् झाला पुनर्जन्म


अहमदाबाद: गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगर येथील गांभोई येथे गुरुवारी जीईबीजवळील शेतात पुरलेली नवजात मुलगी जिवंत सापडली. स्थानिक लोकांनी जमीन खोदून बाहेर काढलं तेव्हा हे बाळ जिवंत होतं. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्या नवजात स्त्री जातीच्या अभ्रकाचे पालक आता सापडले आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दुसऱ्या बाळाची काळजी घेणे शक्य नसल्याने त्यांनीच बाळाला जवळच्या शेतात पुरल्याचे या जोडप्याने सांगितले आहे.

या नर्दयी पालकांना काडी तालुक्यातील नंदसनजवळील डंगरवा गावातून अटक करण्यात आली आहे. वडील गेल्या १५ दिवसांपासून सासरी गांभोई येथे आले होते. गांभोई पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने अखेर खरं सांगितलं.

हेही वाचा –माणुसकीला काळीमा फासणारी घटना! अतिशय धक्कादाय; २ दिवसीय मृत अर्भक लेंडी नाल्यात सापडलं

शेतातील मातीत काहीतरी हलताना दिसले, पाहिलं तर….

एका महिला शेतकऱ्याने हितेंद्र सिंह यांच्या शेतातील मातीत काहीतरी हलताना पाहिल्यानंतर तिने आरडाओरडा केली आणि आजूबाजूचे लोक धावून आले. त्यानंतर खोदून पाहिले असता जमिनीत पुरलेलं स्त्री जातीचं नवजात अभ्रक आढळून आलं. त्यानंतर परिसरातील लोकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर फोन लावला आणि बाळाला हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

हेही वाचा –धक्कादायक! भाजप नेत्यानं मित्राला संपवलं; धड फेकलं अन् मुंडकं घेऊन फिरत होता

१०८ साबरकांठा पर्यवेक्षक जामिन पटेल यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी १० वाजता गांभोई येथील जीईबीजवळील शेतात एक नवजात स्त्री जातीचं अभ्रक मातीत पुरलेली आढळून आल्याचा फोन आला. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. बाळावर रुग्णवाहिकेतच उपचार सुरु करण्यात आले आणि बीव्हीएम द्वारे पुन्हा जीवीत करण्यात आले. मुलीला उपचारासाठी तिला हिंमतनगर सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे तिला सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा –बापानं कुऱ्हाडीनं लेकाचा हात तोडला; हात घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, कारण वाचून थरकाप उडेल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बाळाचे पालक मूळचे गांधीनगर येथील आहेत. बाळाची आई मंजुबेन यांच्या आई-वडिलांचे घर गांभोई येथे आहे. ते नवजात बाळाला येथे घेऊन आले होते. पती-पत्नी गेल्या पंधरा दिवसांपासून गांभोई येथे होते. गांभोई पोलिसांच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी तपास सुरू करून प्रकरणाची उकल केली आहे. चौकशीदरम्यान पोलीस नवजात बाळाच्या आईपर्यंत पोहोचले. नवजात बाळाची नाळही कापलेली नव्हती. म्हणजेच जन्मानंतर लगेचच त्या निष्पाप बाळाला जमिनीत पुरल्याचा संशय आहे.

जेसीबीतून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी… नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: