अनिवासी भारतीयांसाठी RBI ची मोठी घोषणा; आता भारतातील कुटुंबीयांची बिलं थेट भरता येणार


मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या धोरण आढाव्यात मध्यवर्ती बँकेने अनेक पावले उचलली आहेत ज्यामुळे आगामी काळात देशाच्या सेवांमध्ये अनिवासी भारतीयांचा वाटा वाढू शकतो आणि पैसे पाठवण्याचा ओघ वाढू शकतो. रिझर्व्ह बँकेने एक प्रस्ताव दिला आहे, ज्यानुसार अनिवासी भारतीय भारतात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाच्या वतीने शिक्षणासह विविध सेवांची बिले स्वतः भरू शकतील.

तज्ञांनुसार हे पाऊल अशा अनिवासी भारतीयांसाठी खूप फायदेशीर आहे जे भारतात सेवांसाठी नियमित पैसे पाठवतात. याबाबत अधिक माहिती जाहीर होणार अद्याप बाकी असून रिझर्व्ह बँक लवकरच यासंबंधीचे नियम जारी करू शकते.

वाचा – प्राप्तिकर रिटर्न भरताना क्रिप्टो फायद्यांचा उल्लेख नसेल तर बसेल मोठा दंड, कसे टाळायचे ते? जाणून घ्या

पेमेंटची नवीन प्रक्रिया कशी असेल?
अनिवासी भारतीयांद्वारे केले जाणारे पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टमच्या क्रॉस बॉर्डर इनवर्ड पेमेंट सुविधेद्वारे पूर्ण केले जाईल. आतापर्यंत अशा कोणत्याही पेमेंटसाठी अनिवासी भारतीय प्रथम भारतात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करत होते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य या पैशातून बिल भारत होते. या सेवा शाळा महाविद्यालयाच्या फीपासून ते विमा प्रीमियमपर्यंत असू शकतात. मात्र, ही प्रक्रिया फार वेळखाऊ आहे आणि अनेक वेळा दुर्गम (ग्रामीण) भागात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना पुढील पेमेंट करणे सोपे होत नाही. या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने आता अनिवासी भारतीयांना त्यांच्या स्तरावरून हे शुल्क भरण्यासाठी दिलासा दिला आहे. त्यामुळे वेळ वाचेल आणि अनिवासी भारतीयांनाही त्याचा पैसा कुठे खर्च होतोय हे कळेल.

वाचा – बँक बुडाली तर खातेदारांना किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या सर्व नियम आणि कायदे

निर्णयाचा काय फायदा?
पेमेंटची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाल्यामुळे आता अधिकाधिक अनिवासी भारतीय परदेशातून कौटुंबिक बिले भरण्यास सुरुवात करतील, ज्यामुळे देशातील रेमिटन्सचा प्रवाह वाढू शकेल. यासोबतच हे पाऊल भारत बिल पेमेंट सिस्टमला चालना देण्यासाठी देखील मदत करेल कारण अनिवासी भारतीयांकडून त्याचा वापर वाढेल. सध्या भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच बीबीपीएस फक्त भारतीयांसाठी आहे.

ही बिल भरणा प्रणाली ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा प्रदान करते. ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत काम करते. या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला ८ कोटींहून अधिक व्यवहार होतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: