लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या शुभमचं स्वतःच्या घराचं स्वप्न अपूर्ण, दुचाकी घसरली अन्


जळगाव: धरणगाव पंचायत समिती गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत तरुणाचा शुक्रवारी सायंकाळी म्हसले गावाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. शुभम संजय सोनवणे (वय २५) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. शुभम दुसऱ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना स्वतःच्या घराचेही स्वप्न रंगवत होता. मात्र, त्याच्यावर अपघाताच्या रूपाने काळाने झडप घातली अन् त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं.

शुभम सोनावणे हा तरुण धरणगाव पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून २०१९ पासून काम करत होता. शुभम नेहमीप्रमाणे कार्यालयीन काम आटोपून शुक्रवारी (५ ऑगस्ट) अंमळनेरला आपल्या घरी जात होता. परंतू, रात्री साधारण ८ वाजेच्या सुमारास म्हसले ते टाकरखेडा दरम्यान पाऊस सुरु झाला. या पावसामुळे शुभमची दुचाकी घसरली. त्यात शुभमच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा शुभम अखेरच्या प्रवासात स्वतःच्या घरी पोहोचू शकला नाही.

हेही वाचा – जन्मदात्यांनीच नवजात मुलीला जिवंत पुरलं, पण चमत्कार घडला अन् झाला पुनर्जन्म

शुभमच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. घरातली सर्व जबाबदारी शुभमवरच होती. मानधन तत्वावर कार्यरत असल्यामुळे शासकीय सवलती नव्हत्या. परिवाराची परिस्थिती बिकट असल्याने शासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियतीकडून शुभमच्या स्वप्नांचा घात

वडिलांनी मोठ्या कष्टाने शुभमला उच्च शिक्षित केले होते. कठीण परिस्थिती असूनही शुभमने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. नुकतेच त्याने बी.टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे शुभम नेहमी मित्र दिनेश भदाणे (धरणगाव) यांच्यासह कार्यालयीन सहकाऱ्यांना त्याच्यावर असलेल्या पारिवारिक जबाबदारी बाबत बोलायचा. लहान-भाऊ बहिणीचे शिक्षण करायचे आहे. स्वतःचे घर बनवायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा होईल. परंतू लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात माझा हातभार लागतोय, यातच मला मोठा आनंद असल्याची भावना शुभम नेहमी व्यक्त करायचा.

हेही वाचा –३५ तासानंतर साधूचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवला, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

खऱ्या अर्थाने हा शुभमचा नव्हे तर नियतीने त्यांच्या स्वप्नांचा केलेला घात असल्याचे म्हटले चुकीचे ठरणार नाही. शुभमचे वडील ज्या अमळनेर-धरणगाव मार्गावर कालीपिली चालवतात त्याच रस्त्यावर त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न कायमचे पुसले गेले असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा –कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत; रस्त्यात मोठा अनर्थ घडला

‘शुभम’वरून तरुणी भिडल्या, व्हिडिओ व्हायरलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: