नावेत जेवण बनवत होते, भूक लागली होती, काही कळायच्या आत झाला भीषण स्फोट; चौघे जागीच ठार


पाटणा : सोन नदीत नावेत बसून जेवण तयार करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) होऊन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा जिल्ह्याती मनेर येथे घडली. या नावेत प्रवास करत असलेले सर्वजण मजूर होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटात अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. पोलिसांनी मृत मजुरांचे शव ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. (four lost lives in a cylinder blast in a boat while cooking in patna of bihar)

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोजपूर आणि पाटणा जिल्ह्यांच्या सीमेवर झाला आहे. बिंदगावा गावाजवळ रामपूर वाळूघाटाजवळ काही लोक सोन नदीमध्ये नावेत जेवण तयार करत होते. त्याचवेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. एका क्षणात नावेत असलेले सर्वजण गंभीररित्या भाजले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.

जन्मदात्यांनीच नवजात मुलीला जिवंत पुरलं, पण चमत्कार घडला अन् झाला पुनर्जन्म
नावेत असलेले सर्व मजूर हे पाटणा दिल्ह्यातील हल्दी छपरा या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. कोईलवर-बिहटा परिसरातून वाळूचे काम करून ते नावेत जेवण बनवत होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बायको सर्वांसमोर झाडूनं मारते! पतींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणाची आत्महत्या; नदीत जीव दिला
नावेत असणारा सिलेंडर कोणत्या स्थितीत होता? त्याचा स्फोट कसा झाला?, तो सिलेंडर वैध होता की अवैध असा तपास आता पोलीस करत आहेत.

माता न तू वैरिणी: पोटच्या मुलीला आईनेचं संपवलं, मन हेलावून टाकणारी घटनाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: