पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बुरे दिन, लष्करप्रमुखांनी दुसऱ्या देशांपुढे मदतीसाठी हात पसरले


इस्लामाबाद : श्रीलंकेप्रमाणं पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तान आता अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी मित्र राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तान एका बाजूनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिरातकडे मदतीसाठी हात पसरला आहे. संयुक्त अरब अमिरात पाकिस्तानच्या मदतीसाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेला बुरे दिन येण्याची भीती वाटत आहे.

संयुक्त अरब अमिरातमधील सरकारी माध्यमांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानसोबत आर्थिक संबंध वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे. पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीसाठीचा निकष पूर्ण करण्यासाठी ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मिळवणं आवश्यक आहे. पाकिस्तानचे ही मदत मिळवण्यासाठी विविध देशांकडे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जरनल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातकडे देखील मदत मागितली आहे. आयएमएफकडून मदत मिळण्याचे निकष पूर्ण व्हावेत म्हणून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. पाकिस्तानला २४ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करायची आहे.

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी… संकरित गायीच्या पोटी जन्मली देशी कालवड

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचा इशारा दिला आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानला आयातीवर नियंत्रण आणावं लागणार आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणांमुळं देशावर हे संकट ओढावल्याचं ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांच्या सरकारला या संकटातून मार्ग काढावा लागत असल्याचं देखील ते म्हणाले.

जन्मदात्यांनीच नवजात मुलीला जिवंत पुरलं, पण चमत्कार घडला अन् झाला पुनर्जन्म

श्रीलंकेप्रमाणं पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था डबघाईला

भारताच्या शेजारचे देश आर्थिक संकटात सापडले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाली होती. चीननं ऐनवेळी मदत करण्यास नकार दिल्यानं श्रीलंकेवर मोठी नामुष्की ओढावली. श्रीलंकेतील जनतेनं सत्ताधारी राजपक्षेंविरुद्ध जनआंदोलन केलं. पाकिस्तानमध्येही अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.

३५ तासानंतर साधूचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवला, भाजप आमदारावर गुन्हा दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: