भोसे येथे ह.भ.प इंदुरीकर महाराजांचे होणार किर्तन

  • भोसे येथे ह.भ.प इंदुरीकर महाराजांचे होणार किर्तन

पंढरपूर / प्रतिनिधी:- विठ्ठल परिवाराचे नेते, चेअरमन अभिजीत पाटील आणि भोसे येथील युवा नेते प्रा.महादेव तळेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने रविवार दि 7 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे.

वरील वाढदिवसानिमित्त यशवंत विद्यालय भोसे येथे सायंकाळी 7 वाजता या समाजप्रबोधन किर्तनास सुरुवात होणार आहें.यावेळी वाढदिवसानिमित्त चेअरमन अभिजीत पाटील आणि प्रा.महादेव तळेकर यांचा सन्मानही भोसे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहें, तरी भोसे परिसरातील भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भोसेकरांच्या वतीने करण्यात आले आहें.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: