घर घर तिरंगा: सरकारने पाठवले ५१ हजार ध्वज, पण हे काय?… खराब स्थिती पाहून बसला धक्का!


अहमदनगर : ‘घर घर तिरंगा’ मोहिमेत महापालिकेतर्फे वितरीत करण्यासाठी नगरला आलेले ५१ हजार ध्वज खराब निघाले. त्यामुळे ते संबंधित कंत्राटदार कंपनीला परत पाठविण्यात आले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ही मोहीम सुरू केली. यासाठी नगरला ५१ हजार झेंडे पाठविण्यात आले होते. मात्र, यातील जवळपास सर्वच झेंडे निरूपयोग होते. चुकीची छापाई, चुकीच्या आकारात कापलेले, फाटलेले झेंडे आले होते. त्यामुळे ते न वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (51 thousand flags sent by the government to Ahmednagar turned out bad)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘घर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू केली. त्याचेच मराठीकरण करत राज्य सरकारने ‘घर घर तिरंगा’ मोहीम आखली. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. तिरंगा झेंडा विकत घेऊन १५ ऑगस्टला आपल्या घरावर लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी… संकरित गायीच्या पोटी जन्मली देशी कालवड

या मोहिमेला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. तसे आवाहनही करण्यात आले आहे. महापालिकेने स्वतः २५ हजार झेंडे विकत घेऊन ते नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी त्याच्या विक्रीसाठी शहरात २२ ठिकाणी विक्री केंद्र सुरू केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आधी भारतीयांना किंमत नव्हती; रोहित पवारांनी दिले सडेतोड उत्तर

तसेच शासनाकडून काही झेंडे मागविण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडून महापालिकेला ५१ हजार झेंडे मिळाले. मात्र यातील जवळपास सर्वच झेंडे निरूपयोगी असल्याचे लक्षात आले.

क्लिक करा आणि वाचा- अहमदनगरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनामुळे तरुणावर हल्ला? हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: