कहाणी फिल्मी आहे! अनोळखी मुलीला आत्महत्या करण्यापासून रोखलं, बघताच क्षणी प्रेम


लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. येथील एक मुलगी त्याच मुलाच्या प्रेमात पडली ज्याने तिला मृत्यूपासून वाचवलं. मग काय, काही वर्षांनी दोघेही एकत्र राहण्याचे स्वप्न पाहू लागले. आता अल्पवयीन असल्‍याने त्यांचा विवाह होऊ शकत नाही. प्रेमसंबंधांबाबत कुटुंबीयांनाही काही माहिती नव्हती. घरच्यांना सांगितले असते तर ते लग्नाला तयार झाले असते की नाही, अशी भीतीही या दोघांना होती. यावर अल्पवयीन प्रेमीयुगुलाने थेट घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकत्र राहण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून घराबाहेर पडले, मात्र बरेली जंक्शनवर जीआरपीने त्यांना पकडले. चौकशीदरम्यान मुलाने जीआरपीला आपली प्रेमकथा सांगितली (Uttar Pradesh Love Story).

एके दिवशी तो मुलगा रेल्वे रुळावरच्या आसपास फिरत होता, तेव्हा त्याला एक मुलगी रुळावर बसलेली दिसली. त्याला शंका आली की, कदाचित ती मुलगी आत्महत्या तर करणार नाही ना? त्याने पटकन मुलीजवळ जाऊन तिला रेल्वे रुळावरून दूर नेले. घरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी आल्याचे या मुलीने सांगितले. त्यानंतर ती मुलगी तेथून निघून गेली, पण पुढेही ते भेटत राहिले. याप्रकरणातील अल्पवयीने मुलीचे वय १३ तर मुलाचे वय १५ आहे.

हेही वाचा –समुद्रात वाहून गेलेल्या पत्नीचा आला व्हॉइस मेसेज; ‘मी रवीसोबत आनंदी आहे’…

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमाला तीन वर्षे उलटून गेली होती, पण दोघे अजूनही अल्पवयीन होते. दोघांमधलं प्रेम इतकं वाढलं की त्यांनी एकत्र जगण्याच्या आणि मरण्याच्या शपथा घ्यायला सुरुवात केली. अखेर त्यांनी एकत्र जीवन घालवण्यासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही पळून दिल्लीला जात होते. मात्र, बरेली स्थानकावरच ते पकडले गेले.

फोनवरुन सापडले मुलीचे लोकेशन

त्याचवेळी या प्रकरणाबाबत बरेली जीआरपीचे निरीक्षक ध्रुव कुमार म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांनी गोंडा येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस मुलीचा शोध घेत होते. पोलिसांना गुरुवारी रात्री बरेली जंक्शन येथे मुलीच्या फोनचे लोकेशन सापडले. त्यावर पोलिसांनी आम्हाला माहिती दिली. आम्हाला माहिती मिळताच आम्ही मुलीचा शोध सुरू केला.

हेही वाचा –नवऱ्यासाठी ३ गर्लफ्रेंड हव्यात, पगार ३२ हजार महिना; पत्नीची पोस्ट व्हायरल, कारण वाचून थक्क व्हाल

हे दोघेही रात्री फलाटावर बसलेले आढळले. चौकशीदरम्यान दोघेही सुरुवातीला दिशाभूल करत राहिले, मात्र त्यांचे फोन तपासले असता त्यांचं बिंग फुटलं. जीआरपीचे निरीक्षक ध्रुव कुमार यांनी सांगितले की, दोघेही अल्पवयीन आहेत. कुटुंबातील सदस्य येथे आले आहेत. चाइल्डलाइनच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. दोघांनाही कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

१ नंबर वार्डात नवरी, २ नंबर वार्डात करवली, शिरुरच्या ‘विवाह निवडणुकीची’ राज्यात चर्चाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: