द.ह.कवठेकर प्रशालेत पालक शिक्षक संघ सभेचे आयोजन
- द. ह. कवठेकर प्रशालेत पालक शिक्षक संघ सभेचे आयोजन
पंढरपूर – पंढरपूर येथे एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणी स्थापनेची सभा संपन्न झाली. सलग दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर एकत्र सभा होत असल्याने पालक वर्गात उत्साहाचे वातावरण होते. 630 पालकांनी आपली स्वाक्षरी नोंदविली. या सभेत प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी शाळेची प्रगती, वर्षभराचे नियोजन, विद्यार्थी लाभाच्या योजना, विविध शिष्यवृत्त्या, शाळेतील भौतिक सुविधा याबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून एस.आर.कुलकर्णी सर यांची तर सहसचिवा म्हणून ऍडव्हॉकेट सौ.विजया कवठाळकर मॅडम यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सौ.अस्मिता देशपांडे मॅडम उपाध्यक्ष ऍडव्हॉकेट संजय रोंगे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेचे उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. पर्यवेक्षक मधुकर मुंडे व सौ एस. आर. कुलकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्येष्ठ शिक्षक उमेश केसकर यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. एस.एम.कुलकर्णी सर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले.