नोएडातील महिलेवर अरेरावी, त्या कारणामुळं देशभर चर्चा, श्रीकांत त्यागीला अखेर बेड्या


नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या श्रीकांत त्यागी या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार त्यागीसह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नाही. श्रीकांत त्यागीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो एका महिलेला शिवीगाळ करत आणि धमकी देत असल्याचं समोर आलं होतं. श्रीकांत त्यागीचा भाजपसोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. श्रीकांत त्यागीनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर भाजपशी संबंधित असल्याचा उल्लेख केला होता. सोशल मीडिया यूजर्सनी यानंतर भाजपवर देखील आरोप केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली होती.

श्रीकांत त्यागी विरोधात नोएडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. नोएडा पोलिसांनी श्रीकांत त्यागीच्या अटकेसाठी पथकं तयार केली होती. श्रीकांत त्यागीला अटक होणार असल्याची माहिती मिळताच तो फरार झाला होता. पोलिसांनी श्रीकांत त्यागीची पत्नी आणि इतर चार जणांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

डबल Gold Medal… भारताच्या विनेश फोगटने पटकावले सुवर्णपदक, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

या प्रकरणाची तीव्रतालक्षात घेऊन माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार महेश शर्मा हे देखील नोएडातील ओमेक्स सोसायटीमध्ये भेट दिली. महेश शर्मांनी संबंधित पीडित महिलेशी संवाद साधला आणि पुढील ४८ तासांमध्ये श्रीकांत त्यागीला अटक करण्याचं आश्वासन दिलं. याशिवाय तो भाजपशी संबंधित नसल्याचा दावा महेश शर्मांनी केला.

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला सुनावणी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत त्यागी त्याच्या चार चाकी गाडीवर उत्तर प्रदेशच्या सरकारचं बोधचिन्ह लावून फिरत असे आणि त्याचा गैरवापर करत होता. यामुळं श्रीकांत त्यागी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांचे अधिकारी रणविजय सिंह यांना याबाबत अधिक माहिती दिला आहे. नोए़डा पोलिसांनी श्रीकांत त्यागीच्या दोन गाड्या देखील जप्त केल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार त्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तिसरे Gold Medal… पाकिस्तानच्या शरिफला धुळ चारत नवीनने पटकावले सुवर्णपदकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: