चौथं Gold Medal… भाविना पटेलने इतिहास रचत पटकावले भारतासाठी सुवर्णपदक
नवीनने पटकावले तिसरे सुवर्ण
भारताचा कुस्तीपटू नवीनने यावेळी दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. नवीन हा पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दिमाखात पोहोचला होता. अंतिम फेरी नवीनचा सामना हा पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरबरोबर होता. नवीनने शरीफला पराभूत करत भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकवून दिले.
विनेश फोगटने दीड मिनिटांत पटकावले सुवर्णपदक
भारताच्या विनेश फोगटने श्रीलंकेच्या चामोद्या केशनी मदुरावालेज डॉनवर दमदार विजय साकारला आणि भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. विनेशने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर विनेशने प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण जिंकण्याची संधी दिली नाही आणि फक्त दीड मिनिटांमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर केले. कुस्तीमधील हे शनिवारचे तिसरे सुवर्णपदक होते.
रवी दाहियाला सुवर्णपदक
भारताचा कुस्तीपटू रवी दाहियाने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. रवी कुमार दहियाचे संपूर्ण वर्चस्व कारण त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनला कोणतीही संधी दिली नाही आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर १०-० ने विजय मिळवला. त्याने आपले पहिले सुवर्णपदक जिंकण्यासाठी २ मिनिटे आणि १६ सेकंद घेतले.