अर्थव्यवस्था सावरली; दुसऱ्या तिमाहीत कर संकलनात झाली मोठी वाढ


हायलाइट्स:

  • या वर्षात निव्वळ कर संकलन ५७०५६८ कोटी रुपये इतके झाले आहे.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ७४.४ टक्के वाढ झाली आहे.
  • गेल्या वर्षी हे संकलन ३२७१७४ कोटी रुपये इतके होते.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध झालेल्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, या वर्षात निव्वळ कर संकलन ५७०५६८ कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ७४.४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे संकलन ३२७१७४ कोटी रुपये इतके होते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २२ सप्टेंबरपर्यंत झालेल्या संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये हे संकलन ४४८९७६ कोटी इतके होते.

वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी’चा आयपीओ जाहीर
एकूण निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात ३०२९७५ कोटी रुपये कॉर्पोरेट कर (परताव्या व्यतिरिक्त) तसेच २६७५९३ कोटी रुपये, करदात्यांचा वैयक्तिक कर, ज्यात सुरक्षा व्यवहार कर- STT (परतावे वगळता) याचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचे सकल प्रत्यक्ष कर संकलन (परतावे देण्यापूर्वीचे) ६४५६७९ कोटी इतके आहे. गेल्या वर्षी ते ४३९२४२ कोटी रुपये इतके होते. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत या कर संकलनात ४७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे तर सकल प्रत्यक्ष संकलनात १६.७५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. २०१९-२० मध्ये हे संकलन ५५३०६३ कोटी रुपये इतके होते.

वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी’चा आयपीओ जाहीर
सकल किंवा ढोबळ प्रत्यक्ष कर संकलनात ३५८८०६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि २८६८७३ कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर कर, ज्यात २८६८७३ कोटी रुपयांच्या सुरक्षा व्यवहार करांचाही समावेश आहे. सविस्तर विभागणीनुसार अग्रीम कर २५३३५३ कोटी, स्त्रोताच्या ठिकाणीच कापण्यात आलेल्या कराची रक्कम ३१९२३९ कोटी रुपये, स्वयंमूल्यांकन कर ४१७३९ कोटी रुपये, नियमित मूल्यांकन कर २५५५८ कोटी रुपये, लाभांश वितरण कर ४४०६ कोटी आणि इतर संकीर्ण कर १३८३ कोटी रुपये इतके आहेत.

पुढील महिन्यात २० दिवस बँंकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हाने असली तरीही, आर्थिक वर्ष दुसऱ्या तिमाहीत (१ जुलै २०२१ ते २२ सप्टेंबर २०२१ ) अग्रीम कर संकलन १७२०७१ कोटी रुपये इतके होते, ज्यात, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१.५० टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील एकत्रित अग्रीम कर २५३३५३ कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा कर १६२०३७ कोटी रुपये होता. म्हणजेच यंदा अग्रीम कर संकलनात अंदाजे ५६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच एकत्रित अग्रीम कर संकलन यंदा २२ सप्टेंबरपर्यंत २५३३५३ इतके झाले असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.६२ टक्क्यांची वाढ झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: