सोलापूर पुनर्वसन विभागाच्या कारभारात भ्रष्टाचार असा दीपक चंदनशिवे यांचा आरोप

सोलापूर पुनर्वसन विभागाच्या कारभारात भ्रष्टाचार असा दीपक चंदनशिवे यांचा आरोप

मुंबई येथील आझाद मैदान मंत्रालय येथे आंदोलनाचा इशारा Deepak Chandanshive alleges corruption in Solapur Rehabilitation Department

पंढरपूर / प्रतिनिधी – सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले असून याबाबत चौकशीचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांना मंत्री वडेट्टीवार यांनी दिले असल्याची माहिती चंदनशिवे यांनी दिली .

याप्रसंगी दत्ता वाघमारे, समाधान बाबर,खंडू बाबर,विजयकुमार खरे,राजकुमार भोपळे,महादेव सोनवणे,श्रीनाथ बाबर, नागनाथ मोरे, विश्‍वजित मोरे,विजय वाघमारे,भास्कर चंदनशिवे,रवी भोसले आदी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले चौकशीचे आदेश

प्रकल्पग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्ता तून नाराजी व्यक्त केली जात आहे.सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,माढा, मंगळवेढा,माळशिरस,करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे.सदर प्रकल्पग्रस्तांना जमीन खरेदी, विक्री व्यवहारात दलाल,अधिकारी व कर्मचारी यांची साखळी तयार झाली आहे.अशी मिलीभगत करून प्रकल्पग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कमी किंमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे . यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी , विक्री व्यवहार ही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत.काही प्रकल्प ग्रस्तांचे एकाच आदेशावर दोन दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला.या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: