मूल होत नाही म्हणून नराधम पतीने केले पत्नीसोबत अमानुष कृत्य; मित्राला घरी आणले अन्…


हायलाइट्स:

  • अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना
  • पत्नीवर नराधम पतीचे अत्याचार
  • मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग

अहमदनगरः राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना पाथर्डी तालुक्यात पतीनेच पत्नीवर मित्राच्या मदतीने अत्याचार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नाही, म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडणारा पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क केला आणि पोलिसांत जाऊन फिर्याद दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

कल्याणच्या एका २२ वर्षीय तरुणीचे पाथर्डी तालुक्यातील एका गावातील तरुणाशी २०२० मध्ये लग्न झाले आहे. काही काळ पतीच्या कुटुंबियांसह ती सासरी राहिली. त्यानंतर भांडण झाल्याने माहेरी निघून गेली होती. मागील महिन्यात ती सासरच्या गावातच राहणाऱ्या तिच्या आजोबांकडे राहण्यासाठी आली. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिचा पती तिच्या आजोबांच्या घरी आला. झाले गेले विसरून जाऊन पुन्हा नांदायला चल असे म्हणून तिला सोबत घेऊन गेला. तीही नांदायला तयार झाली.

वाचाः राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; ‘हे’ आहे कारण

सासरी राहत असताना २२ सप्टेंबरच्या रात्री तिचा पती त्याच्या एका मित्रासह घरी आला. घरात दोघांनी तिच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. आपल्याला मूल हवे असल्याने तू या मित्राशी संबंध ठेव, असे पतीने पत्नीला सांगितले. यासाठी तिने नकार दिला. तेव्हा पतीने तिला पकडून तिच्या तोंडात जबरदस्तीने दोन गोळ्या टाकल्या. त्यामुळे तिला काही वेळातच चक्कर आली. त्यानंतर पतीच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पतीनेही अत्याचार केले. नंतर मित्र निघून गेला. पतीने तिला धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगू नको. मूल हवे असेल तर मित्राशी संबंध ठेवावेच लागतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तो मित्र घरी आला. त्या दोघांनीही पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.

वाचाः भायखळा कारागृहात खळबळ; ३९ कैद्यांना करोनाची लागण

दुसऱ्या दिवशी दुपारी पती घरी नसताना त्या तरुणीने शेजारी राहणाऱ्या महिलेकडे जाऊन तिच्या मोबाईलवरून माहेरी संपर्क केला. त्यानुसार तिचा मामा तिच्याकडे आले. दोघांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

वाचाः ‘या’ जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस; नदीच्या पुरात अनेक जनावरे गेली वाहूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: