pm modi in mann ki baat : जागतिक नदी दिनाला PM मोदींचे जनतेला ‘हे’ कळकळीचे आवाहन


नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी आज ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. त्यांचा हा ८१ वा कार्यक्रम होता. पंतप्रधानांनी जागतिक नदी दिनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी नद्यांचं महत्त्व सांगितलं आणि भारतातील नद्यांवरील श्रद्धेवर चर्चा केली. हा एक दिवस आहे जो आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी जुळलेला आहे. हा आहे ‘जागतिक नदी दिवस’ आहे. आपण नद्यांना प्रदूषणुक्त करण्यासाठी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करूया, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.

“पिबन्ति नद्यः, स्वय-मेव नाम्भः ” याचा अर्थ नद्या स्वतःचे पाणी पीत नाहीत, तर त्या दान करतात. आपल्यासाठी नद्या ही भौतिक वस्तू नाही, नदी ही एक सजीव वस्तू आहे आणि म्हणूनच आपण नद्यांना माता म्हणतो. आपल्याकडे एवढे सण आणि उत्सव आहेत. हे सर्व आपल्या आईच्या कुशीत आपण साजरे करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

माघ महिना येतो, तेव्हा आपल्या देशातील बरेच नागरिक गंगा किंवा इतर कोणत्याही नदीच्या काठावर संपूर्ण महिना पूजा करतात. आता ही परंपरा राहिली नाही. आपण घरी स्नान करतानाही नद्यांची आठवण करण्याची पूर्वीची परंपरा होती. आज ती कदाचित नाहीशी झाली असेल किंवा फार कमी प्रमाणात जिवंत राहिली असेल, पण ती खूप होती मोठी परंपरा. यातून पहाटे आंघोळीवेळी विशाल भारताची सहल होत होती. ती एक मानसिक यात्रा होती! हे देशाच्या कोनाकोपऱ्याशी जोडण्याची प्रेरणा बनत होती, असं ते म्हणाले.

‘गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति. नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु ॥’ आपल्या देशात स्नानावेळी हा श्लोक म्हणण्याची परंपरा होती. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना हा श्लोक म्हणायला शिकवायची. यामुळे देशात नद्यांबद्दल श्रद्धा निर्माण होत होती. भव्य भारतानचे एक चित्र समोर उभे ठाकत होते. नद्यांशी आपण जोडले जात होतो. ज्यावेळी नदीला आपण एका मातेच्या स्वरुपात जाणतो, पाहतो, जगतो त्या दिवशी एक श्रद्धा निर्माण होते, ही संस्काराची प्रक्रिया होती, असं सांगत त्यांनी नद्यांच्या प्रदूषणावर बोट ठेवलं.

PM मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतले; भाजप नेत्यांनी केले जंगी स्वागत

पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात स्वच्छतेचे महत्त्व देखील सांगितले. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडले आहे. कुठल्याही गोष्टीला छोटी समजण्याची चूक कधीही करू नका. छोट्या प्रयत्नांमुळे कधी कधी मोठे बदल घडतात. आपण महात्मा गांधींच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या आयुष्यात लहान लहान गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या, हे दिसून येईल. स्वच्छता मोहिमेने स्वातंत्र्य चळवळीला सतत ऊर्जा कशी दिली हे आजच्या आपल्या तरुणांना माहित असले पाहिजे. महात्मा गांधींनीच स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले होते. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडले होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

… त्यावेळी सोनियांनी शरद पवारांना पंतप्रधान करायला हवं होतंः आठवले

महात्मा गांधीजींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडले होते, त्याच प्रकारे खादीला स्वातंत्र्याची एक ओळख दिली होती. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत खादीचा जो गौरव होता, आज आमची तरुण पिढी खादीला ते वैभव देत आहे. आज खादी आणि हातमागचे उत्पादन अनेक पटीने वाढले आहे आणि त्याची मागणी देखील वाढली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: