uddhav thackeray : अमित शहांची नक्षलवादावर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी


नवी दिल्लीः नक्षलावादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत आज दिल्ली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. नक्षलप्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते. तर पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आणि केरळ या राज्यांचे मुख्यमंत्री गैरहजर होते.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी यावेळी अमित शहांनी नव्या धोरणावर चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. नक्षलवादाविरोधात निर्णायक ठोस कारवाई करण्यासाठी नव्या धोरणावर काम करण्याची गरज आहे, असं अमित शहा म्हणाले. ही बैठक दोन टप्प्यात झाली. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसंच राज्यांनी नक्षलवादविरोधी अभियानाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. दुसऱ्या टप्प्यात विकास योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, यावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलप्रभावित भागातील सुरक्षा आणि विकासकामांचा आढावा घेतला.

नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत काही राज्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहीए. नक्षलवाद्यांविरोधात ठोस आणि सडेतोड कारवाई करण्यासाठी राज्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं, असं केंद्राने म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं. नक्षलग्रस्त भागांमध्ये रस्ते बांधावेत, मोबाइल कनेक्टिव्हिटी वाढवावी तसंच बँकींग सुविधा देण्यावर भर द्यावा, अशी मागणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली.

uddhav thackeray amit shah :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासकामांसाठी केंद्राने अधिक निधी उपलब्ध करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली. विकास कामं, नवीन पोलिस पोस्ट, नवीन शाळा आणि मोबाइल टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: