MI vs RCB : आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात एकमेव मोठा बदल, कोणता जाणून घ्या…


शारजा : आरसीबीविरुद्धच्या आजच्या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात एकमोव मोठा बदल केला आहे. कारण हा सामना गमावल्यावर मुंबई इंडियन्सची चिंता आणखीनच वाढू शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या संघात अनुभवी हार्दिक पंड्याला स्थान दिले आहे. यावेळी हार्दिक संघात आला असून सौरभ तिवारीला संघाबाहेर करण्यात आले आहे.

पंजाब किंग्सने शनिवारी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांचेही आठ गुण झाले. त्याचबरोबर पंजाबचा रनरेट हा मुंबईपेक्षा चांगला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाची पाचव्या स्थानावरून घसरण झाली असून ते आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यामुळे आरसीबीच्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे टेंशन वाढलेले असेल. मुंबई इंडियन्सने या आयपीएलमध्ये ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांमध्ये त्यांना चार विजय आणि पाच पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यात सध्याच्या घडीला ८ गुण आहेत आणि त्यांचे पाच सामने अजून बाकी आहेत. कोणत्याही संघाला आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे किमान १६ गुण असायला हवेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आता पाचपैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत. आजच्या सामन्यात जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर यापुढील चारही सामने त्यांना जिंकावे लागतील. पण आजच्या सामन्यात जर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर त्यांना गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर येण्याची नामी संधी असेल.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक झहीर खानने हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर या सामन्याच्या निवडीसाठीही उपलब्ध असणार आहे, अशी माहितीही झहीरने दिली होती. त्यामुळे या सामन्यात हार्दिक खेळणार, असे संकेत मुंबई इंडियन्सने दिले होते. पण हार्दिकला संघात स्थान दिल्यावर टीमधून कोणाला वगळायचे, हा सर्वात मोठा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या संघापुढे होता. कारण मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज अजूनही लयीत दिसत नाहीत आणि सौरभ तिवारी हा अर्धशतक झळकावून संघातील स्थान निश्चित करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनापुढे या सामन्यापूर्वी मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळआले होते.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: