punjab cabinet expansion : पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, १५ नवे मंत्री; अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीयांना डच्चू
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांची पत्नी रजिया सुलताना यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तृप्त राजिंदर बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंदर सिंग सहकारिया आणि राणा गुरजीत सिंग यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
विजययिंदर सिंगला, भारत भूषण आशु, रणदीप सिंग नाभा आणि राजकुमार वेरका यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. संगत सिंग गिलजियां, परगट सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि गुरकीरत सिंग कोटली यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
एकूण १५ मंत्र्यांनी शपथ घेतली. चरणजीत सिंग चन्नी यांनी २० सप्टेंबरला मुख्ममंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर ६ दिवसांनी आज चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागली आहे. तर ६ आमदार पहिल्यांदा मंत्री झाले आहेत. तर अमरिंदर सिंग यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.
mamata banerjee : ममता बॅनर्जींची जीभ घसरली! मृत भाजप नेत्याची तुलना केली सडलेल्या कुत्र्याशी
हरीश रावत म्हणाले…
मंत्रिमंडळात ज्या नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यांना सरकार आणि संघटनेत स्थान दिले जाईल. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे, असं पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी मत्रिमंडळ विस्तारानंतर सांगितलं.