कधी येणार LICचा आयपीओ; अर्थ मंत्रालयाच्या ‘सीईए’नी दिली माहिती


हायलाइट्स:

  • सरकारी कंपनी एलआयसीच्या आयपीओला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे.
  • आयपीओ व्यवस्थापनासाठी सरकारने १० मर्चंट बँकर्सची नेमणूक केली आहे.
  • LIC आयपीओ या आर्थिक वर्षात येईल, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची माहिती

हैदराबाद : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) या आर्थिक वर्षात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी दिली. सरकारी कंपनी एलआयसीच्या आयपीओला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी सरकारने १० मर्चंट बँकर्सची नेमणूक केली आहे.

एलन मस्क यांनी एकाच दिवसात कमावले ३७,४२२ कोटी रुपये; जेफ बेझोस पडले पिछाडीवर
एलआयसी चौथ्या तिमाहीत होणार सूचीबद्ध
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत एलआयसीची सूची (लिस्टिंग) तयार केली जाईल, असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) च्या ‘PGPMAX लीडरशिप समिट, २०२१’ मध्ये शनिवारी चर्चा सत्राला संबोधित करताना सुब्रमण्यम म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये खाजगीकरणातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य आहे. एअर इंडियाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू आहे. यासाठी आतापर्यंत दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. भारत पेट्रोलियम आणि एलआयसी देखील सूचीबद्ध केले जाणार आहेत.

सोनं-चांदी झालं स्वस्त ; ‘या’ कारणाने सोने-चांदीच्या किमतीत झालीय घसरण
खाजगीकरणासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे
सुब्रमण्यम म्हणाले की, “इतिहासाच्या दृष्टिकोनातून खाजगीकरणासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे वर्ष असेल, असे मला वाटते.” खाजगीकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम यांनी स्वावलंबी भारताच्या धोरणातील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि खासगीकरणासाठीच्या महत्त्वपूर्ण सुधारणा यांचा उल्लेख केला.

अर्थव्यवस्था सावरली; दुसऱ्या तिमाहीत कर संकलनात झाली मोठी वाढ
एलआयसीसाठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) चे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीजसह १० मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: