धक्कादायक! धावत्या ट्रकमध्येच चोरीचा प्रयत्न; ४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त


हायलाइट्स:

  • ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याच्या प्रकार उघड
  • ट्रक आणि ४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त
  • आरोपींचा शोध सुरू

भंडारा : महामार्गावर धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याच्या प्रकार उघड झाला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक आणि ४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्याच्या प्रकार घडला असून ट्रक चालकाच्या सर्तकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी चोरटे आपला ट्रक सोडून पसार झाले आहेत, ज्याची तक्रार भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी नोंद करत ट्रक ताब्यात घेत ४ लाख रुपयांच्या चोरीचा माल जप्त केला आहे.

Houses Flooded In Solapur: उत्तर सोलापूर तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा; घरे पाण्यात, तर शेतीचे प्रचंड नुकसान

नेमकं काय घडलं?

रात्रीच्या सुमारास एक ट्रक एमवे कंपनीचे साहित्य घेऊन जात होता. त्यावेळी वाटेत सदर ट्रकच्या मागे दुसऱ्या ट्रकमधून काहीजण पाठलाग करत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. शंका येताच चालकाने ट्रकमधील सामान तपासले असता मौदा ते लाखनी दरम्यान या ट्रकमधून 4 लाख रूपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यावरून चालकाने शोध घेतला असता एक आयशर ट्रक आढळून आला. चालकाने ताबोडतोब याची माहिती कारधा पोलिसांना दिली. मात्र पोलीस पोहोचताच आरोपी ट्रक सोडून फरार झाले.

दरम्यान, कारधा पोलिसांनी चोरीस वापरण्यात आलेला ट्रक आणि ४ लाख रुपयांचा चोरलेला माल जप्त केला असून चालक लवकुश तिवारी यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून कारधा पोलीस पुढील तपास करत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: