नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतली. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते. याशिवाय पंतप्रधान एक तास गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्याशी संबंधित माहिती दिली आणि धोरणात्मक चर्चा केली, असं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी आजच अमेरिका दौऱ्यावरून परतले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी रविवारी पालम विमानतळावर अमेरिका दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी केलेली चर्चा, क्वाड बैठक आणि संयुक्त राष्ट्रांना केलेल्या संबोधनाचा उल्लेख भाजप अध्यक्ष नड्डांनी मोदींच्या स्वागतावेळी केला. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि साम्राज्यवादासारख्या जागतिक मुद्द्यांवर ठामपणे आपले विचार मांडले, असं नड्डा म्हणाले. up cabinet expansion : यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये
अमेरिका दौऱ्यात पीएम मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यांनी नाव न घेता पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला. दहशतवादाचा ‘पॉलिटिकल टूल’ म्हणून वापरऱ्यांनाही त्याचा धोका आहे. आपल्याला सागरी संसाधनांचा वापर करायचा आहे आणि त्यांचा गैरवापर किंवा अति-शोषण करू नये. अफगानिस्तानच्या भूमीचा उपयोग हा दहशत पसरवण्यासाठी केला जाऊ नये, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.