sonia gandhi sharad pawar : … त्यावेळी सोनिया गांधींनी शरद पवारांना PM करायला हवं होतंः रामदास आठवले


इंदूरः काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( sonia gandhi ) यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गाजला होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( ramdas athawale ) यांनी हा मुद्दा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू शकतात तर मग इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाही? असं रामदास आठवले म्हणाले.

पंतप्रधान मोदी हे अमरिकेच्या दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांचे हे वक्तव्य आले आहे. पंतप्रधान मोदींची दोन दिवांपूर्वी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबतही बैठक झाली. आता रामदास आठवले यांनी पंतप्रधानपदा उपस्थित केला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी यूपीएला बहुमत मिळाले होते. सोनिया गांधींना पंतप्रधान करावं, असा प्रस्ताव आपण तेव्हा मांडला होता. तसंच सोनियांचा विदेशी वंशाच्या मुद्दा निरर्थक आहे, असं आपण म्हटल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात तर मग भारताचे नागरिक आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेच्या खासदार सोनिया गांधी या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असं रामदास आठवले म्हणाले. २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवं होतं. पण सोनियांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं तर मग त्यांनी काँग्रेसला बळकट करण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले.

‘चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवले असेल तर त्यांना कोण थांबवणार?’

शरद पवार हे लोकनेते आहेत. पंतप्रधानपदासाठी त्यांच्यात पात्रता होती. पण काँग्रेसने मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले, शरद पवारांना केले नाही. शरद पवार २००४ मध्ये पंतप्रधान झाले असते तर काँग्रेस मागे पडली नसती. आज काँग्रेसची तीच स्थिती आहे, असं ते म्हणाले.

‘छगन भुजबळ यांच्याविरोधात पुरावेच नाहीत’

१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना

सोनिया गांधींच्या विदेश वंशाच्या मुद्द्यावरून शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: