PM मोदींची धडक पाहणी! नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले


नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट दिली. पंतप्रधान मोदी सुमारे एक तास त्या ठिकाणी होते आणि संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी पीएम मोदींनी सुरक्षेचे काळजी घेतली होती. त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते.

संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. २०२२ मध्ये संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल. नवी संसद त्रिकोणी आकाराची असेल. २०२२ मध्ये स्वातंत्र्य दिनाला इमारत बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. २०२२ मधील संसदेचं पावसाळी अधिवेशन हे नव्या इमारतीत घेण्याचा सरकारचा विचार आहे.

pm modi meeting : PM मोदींची अमित शहा, राजनाथ सिंहांसोबत अडीच तास बैठक; नड्डाही होते उपस्थित

पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षा १० डिसेंबरला सेंट्र विस्टा प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. इमारतीचे बांधकामहे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी करत आहे. या योजनेवर ९७१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

pm modi in mann ki baat : जागतिक नदी दिनाला PM मोदींचे जनतेला ‘हे’ कळकळीचे आवाहन

नव्या संसद भवनात लोकसभेच्या ८८८ सदस्यांसाठी आसन व्यवस्था असेल. याशिवाय राज्यसभेत ३२६ हून अधिक सदस्यांची आसन व्यवस्था असेल. तसंच १२२४ सदस्यांची एकाच वेळी बसण्याची व्यवस्थाही असले. प्रत्येक सदस्यासाठी ४०० चौरस फूटांचे ऑफीस असेल. नवी संसद जुन्या इमारतीच्या १७ हजार चौरस मीटर मोठी आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: