narayan rane: ‘आणखी कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो’; राऊतांनी राणेंना डिवचलं


हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना डिवचले.
  • राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले असे उपस्थित पदाधिकाने राऊत यांचे भाषण सुरू असताना म्हटले.
  • त्यावर आणखी कशावरू उठवायचं ते सांगा, तिथूनही उठवतो, असे राऊत यांनी म्हटले.

भोसरी (पुणे): पुण्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भोसरी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात चौफेर टोलेबाजी करत आगामी महापालिका निवडणुकीत पुढे कसे जायचे याबाबत अनेक सूचक विधाने केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीत एकत्र येत नसेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची शिवसेनेचे तयारी असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षावर बोलत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जोरदार टोला लगावला. (shiv sena mp sanjay raut criticizes union minister narayan rane)

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी शिवसेनेचे म्हणणे ऐकले पाहिजे अशी भूमिका राऊत यांनी मांडली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत उत्तम चालले असल्याचे म्हणत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला टोला लगावला. आपली व्यवस्था उत्तम चालू असल्याने विरोधी पक्षाला त्रास होत असतो, असे राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-शिवसेना पवारांचा गड भेदणार?; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य

राऊत यांनी विरोधी पक्षाचा मुद्दा काढताच उपस्थित पदाधिकाऱ्यांमधून एका पदाधिकाऱ्याने मोठ्याने कोंबडी चोर असा उल्लेख केला. त्याला प्रतिसाद देत राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा उल्लेख केला. राऊत म्हणाले, ‘अटक झाली ना?’, त्यावर उपस्थित पदाधिकारी म्हणाला की ‘जेवणावरून उठवलं आहे’. त्याला प्रतिसाद देत राऊत म्हणाले की,अजून कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. शिवसेना ही आग आहे.

क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

चंद्रकांत पाटील यांनाही लगावला टोला

पदाधिकारी मेळ्याल्यात बोलताना संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही पदावर बसले नाहीत. असे असतानाही ते या देशाचे सगळ्यात मोठे सत्ताधीश आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शासकीय पद स्वीकारले नाही. त्यांना अनेक पदांची लालसा धरता आली असती. त्यामुळे जे मंत्री, आमदार, खासदार होतात त्यांना सांगतो, की हे काही नाही. पक्ष महत्त्वाचा, पक्षाचे संघटन महत्त्वाचे. संधी असतानाही मी कधीही केंद्रामध्ये मंत्री झालो नाही कारण मला सामनाचे पद सोडावे लागले असते. ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा पक्षाचे काम करायचे असते तेव्हा मी ते करतो. मंत्रिपदे येतात आणि जातात. मग लोक म्हणतात की मला माजी म्हणू नका. आम्हाला कधी कोणी माजी म्हणणारच नाही, असे म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज करोनाच्या मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही झाले कमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: