cyclone gulab : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा तडाखा; ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू


नवी दिल्लीःगुलाब चक्रीवादळ ( cyclone gulab ) आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. हवामान खात्याने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळ पुढील तीन तासांत आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि ओडिशामधील गोपालपूर दरम्यानची किनारपट्टी ओलांडेल, असं भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं.

हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार ढगांनी किनारपट्टीचे क्षेत्र व्यापले आहे आणि अशा प्रकारे आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टी चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन तासांमध्ये चक्रीवादळ कलिंगपट्टणममधील किनारपट्टी ओलांडेल आणि गोपालपूर, कलिंगपट्टणमच्या उत्तरेस सुमारे २५ किमी पुढे सरकेल. किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्याने ९० किमी प्रति तास वेगाने वेग वाहत आहेत.

पंतप्रधान मोदींनी रविवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डींशी चर्चा केली. तसंच चक्रीवादळ ‘गुलाब’ मुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी केंद्र सरकारकडून पूण मदत करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं.

up cabinet expansion : यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये

pm modi meeting : PM मोदींची अमित शहा, राजनाथ सिंहांसोबत अडीच तास बैठक; नड्डाही होते उपस्थित

मे महिन्यात आलेल्या ‘यास’ चक्रीवादळानंतर चार महिन्यानंतर हे दुसरं चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकत आहे. यावेळी वादळामुळे ९५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभाने आधीच वर्तवला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: