अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवण्याची धमकी देणाऱ्याला अटक, ‘अँटिलिया’बाहेर बंदोबस्त वाढवला


मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना आज (१५ ऑगस्ट) सोमवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोन नंबरवर एका व्यक्तीने ८ वेळा धमकी देणारा फोन केला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दहिसर येथून एका व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

वाचा- शिंदे सरकारमध्ये खातेवाटपावरून नाराजी? गिरीश महाजन जरा स्पष्टच बोलले

वाचा- शिंदे सरकारच्या या निर्णयाला प्राजक्ता माळीचा फुल्ल सपोर्ट! स्वातंत्र्यदिनापासून म्हणणार नाही…

मुंबई क्राइम ब्राँचने बोरिवलीच्या MHB कॉलनीतून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने तो दहिसरचा असल्याचे म्हटले आहे. त्याच्या एकूण बोलण्यावरून तो मनोरुग्ण असल्याचे वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एनआयए देखील चौकशी करणार असल्याचे समजते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: