Gold Rate Today: सोन्यात पैसे कमवायचे आहेत? हे पर्याय ठरतील फायदेशीर; वाचा कुठे व्हाल मालामाल


Gold Rate Today: आज देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९४७ मध्ये सोन्याचा दर ८८ रुपये १० ग्रॅम इतका होता. आज हेच सोनं ५२००० रुपयांवर पोहोचलं आहे. आधी केवळ दुकानातून सोनं खरेदीचा पर्याय होता, पण आता सोनं खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोनं फिजिकल फॉर्मेट आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्मेटमध्ये खरेदी करता येतं. तुम्ही अनेक ॲप्सच्या माध्यमातून डिजीटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करू शकता. त्याशिवाय गोल्ड म्यूच्युअल फंड्सही असतात. गोल्ड ईटीएफद्वारे तुम्ही डिमॅट अकाउंटद्वारेही सोनं खरेदी करू शकता. तसंच सॉवरेन गोल्ड बॉण्डही काही कालावधीसाठी उपलब्ध असतो. भारतीय रिझर्व्ह बँक दर एक-दोन महिन्यात सॉवरेन गोल्ड बॉण्ड इश्यू करतं, ज्याची खरेदी करता येतं.

सोने गुंतवणूक

फिजीकल गोल्डशिवाय सोन्यात डिजीटल गोल्ड (Digital Gold), गोल्ड ईटीएफ (Gold ETF), गोल्ड म्यूचुअल फंड्स (Gold Mutual Funds), सॉवरेन गोल्ड बॉण्डसारख्या (Sovereign Gold Bond) विविध फायनेंशिअल इन्स्ट्रूमेंट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. या सर्व गुंतवणुकीमध्ये एक बाब सारखी आहे, ती म्हणजे याच्या किमती सोन्याच्या दराशी लिंक्ड असतात. पण यात रिटर्न्स, लिक्लिडिटी, रिस्क, लॉक-इन पीरियड, खरेदीचे पर्याय आणि टॅक्स अशा बाबतीत फरक असतो. हेही वाचा – स्वतंत्रदिनी स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक, काय आहे फायदे आणि तोटे

फिजीकल गोल्ड

फिजीकल गोल्ड (Physical Gold) अर्थात दुकानातून सोनं खरेदी करताना यात नुकसान म्हणजे मेकिंग आणि डिझायनिंग चार्जेस लागल्याने हे अधिक महाग होतं. हे सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवल्यास त्यावरही पैसे खर्च करावे लागतात. तसंच फिजीकल गोल्डची विक्री करणंही महाग आहे, कारण हे शुद्ध सोनं नसतं. याचं शुद्धता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसंच हे कुठून खरेदी केलं याचीही माहिती काही परिस्थितीमध्ये द्यावी लागते. हेही वाचा – पेन्शनबाबत सरकारची मोठी घोषणा, वाचा तुम्हाला कसा होणार फायदा

जोखीम

फिजीकल गोल्ड चोरी होण्याची शक्यता असते. तसंच मेकिंग प्रोसेससह काही लहान-मोठ्या समस्याही असतात. डिजीटल सोन्यात धोका म्हणजे नियामक स्तर. या कंपन्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही SEBI, RBI किंवा इतर कोणतीही नियामक संस्था नाही. रेग्यूलेशनचा अभाव हा डिजीटल सोन्यासाठी एक मायनस पॉईंट आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्स किंवा गोल्ड ईटीएफ अशा गोष्टी आहेत, ज्या फिजीकल गोल्डद्वारे समर्थित आहे. ईटीएफ थेट सोनं किंवा सोन्याच्या खाणकाम आणि रिफाइनिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

गोल्ड म्युच्यूअल फंड

गोल्ड म्युच्यूअल फंड (Gold Mutual Funds) हा ईटीएफचा विस्तार आहे. गोल्ड म्युच्यूअल फंड अनेक गोल्ड ईटीएफमध्ये (Gold ETF) गुंतवणूक करतात. गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्यूच्युअल फंड्स हे दोन्हीही सेबीच्या (SEBI) निगराणीखाली येतात. त्यामुळे हे सुरक्षित ठरतं. त्याशिवाय सॉवरेन गोल्ड बॉण्डही सुरक्षित पर्याय असून यात धोका अतिशय कमी आहे. ज्यावेळी भारत सरकार सॉवरेन गॅरंटीमध्ये डिफॉल्ट झाल्यास अशावेळी सॉवरने गोल्ड बॉण्ड असुरक्षित ठरू शकतात.

सोन्याने किती दिले रिटर्न्स?

सोन्याने मागील ४० वर्षांत ९.६ टक्क्यांच्या दराने वार्षिक रिटर्न्स दिले आहेत. सोनं आणि शेअर बाजारामध्ये एकप्रकारचा उलट संबंध असतो. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होते, मार्केटमध्ये अस्थिरतेचं वातावरण असतं, त्यावेळी सोने दरात तेजी पाहायला मिळते. ज्यावेळी अर्थव्यवस्थेत घसरण होते, किंवा एखादी आर्थिक आपत्ती येते त्यावेळी सोने दरात चांगली वाढ पाहायला मिळते. करोना काळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारातील अस्थिरतेचं वातावरण पाहता गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले होते. यादरम्यान सोने दरात मोठी वाढ झाली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: