‘माझी बायको मला CSKची जर्सी घालू देत नाही’; RCBच्या फॅनची तक्रार


नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या यूएई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चाहते स्टेडियमवर पोहोचून आपल्या आवडत्या संघांना जोरदार पाठिंबा दर्शवत आहेत.

वाचा- RCB vs MI Preview: पराभवाची हॅट्रिक रोखण्यासाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

तीन वेळा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ शुक्रवारी (२४ सप्टेंबर) आमने-सामने आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने हा सामना ११ चेंडू आणि ४ गडी राखून जिंकला.

वाचा-धोनीने दिला सर्वांना धक्का; या खेळाडूसाठी विजय मिळवून देणाऱ्या बाहेर बसवले

हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येत प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते, पण एक व्यक्ती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली होती. बंगळुरू संघाची जर्सी घातलेल्या या व्यक्तीच्या हातात एक फलक होते. त्या फलकावर लिहिले होते की, ‘माझी पत्नी मला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालू देत नाही.’ यावरून हे स्पष्ट होते की, तो व्यक्ती चेन्नई सुपर किंग्जचा फॅन आहे, पण त्याची पत्नी विराट कोहलीच्या आरसीबीची फॅन आहे. त्यामुळे त्याला नाईलाजाने आरसीबीची जर्सी घालावी लागत आहे.

वाचा- Video : झुलन गोस्वामीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारी ती जगातील पहिली गोलंदाज

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या जोडप्याचा फोटो अपलोड केला आहे. लाल आणि पिवळ्या हृदयाच्या इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रेमाचा कोणताही रंग नसतो.’

सीएसकेने अपलोड केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘गोंडस’, तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, ‘तिला घटस्फोट द्या.’ आणखी एका चाहत्याने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची आठवण करून दिली आहे. कारण फोटोमध्ये दिसणाऱ्या एकाही चाहत्याने मास्क घातलेला नाही तसेच त्यांच्यात कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे दिसून येते.

वाचा- AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ भारताने रोखला; सलग २६ विजयांची मालिका खंडीत

बंगळुरूचा सलग दुसरा पराभव
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (५३) आणि युवा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७०) यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली, पण सीएसकेच्या गोलंदाजीने बंगळुरूला १५६ धावांवर रोखले.

सीएसकेने १८.१ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात १५७ धावा करत विजयाची मालिका सुरू ठेवली. सीएसकेचा हा सातवा विजय होता. त्याचबरोबर मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झालेला आरसीबीचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: