Cyclone Gulab: ‘गुलाब’ चक्रीवादळात आंध्राचे काही मच्छिमार बेपत्ता, शोध सुरू


हायलाइट्स:

  • प्रशासनाकडून बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू
  • समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन

नवी दिल्ली : ‘गुलाब’ चक्रीवादळानं ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना धडक देऊन पुढे वाटचाल सुरू ठेवलीय. मात्र, आता या वादळाचा वेग कमी झाला आहे. दरम्यान आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील काही मच्छिमार या वादळात बेपत्ता झाल्याचं समोर येतंय.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील काही मच्छिमार बेपत्ता झाल्याची माहिती मिळतेय. समुद्रातून किनाऱ्यावर परतण्या अगोदरच या मच्छिमारांच्या बोटीनं वादळात लाटांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या बोटीतील मच्छिमार समुद्राच्या पाण्यात पडले. स्थानिक प्रशासनाला ही माहिती मिळताच त्यांनी बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू केला आहे.

कलिंगपटनमला ‘गुलाब’चा लँडफॉल

रविवारी सायंकाळी जवळपास ६.०० वाजल्या दरम्यान गुलाब चक्रीवादळाची ‘लँडफॉल’ प्रक्रिया पार पडली. समुद्रातील दाबामुळे निर्माण झालेल्या या वादळानं आंध्र प्रदेशातील कलिंगपटनम आणि ओडिशाच्या गोपाळपूरच्या समुद्रकिनाऱ्यांना धडक देत जमिनीवर प्रवेश केला.

cyclone gulab : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा तडाखा; ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू
PM मोदींची धडक पाहणी! नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले

चक्रीवादळाचं भयंकर रुप लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांना मदतीचं आश्वासन दिलंय.


३९ हजार नागरिक सुरक्षित स्थळी

हवामान विभागानं या वादळाची तीव्रता लक्षात घेत सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्रकिनारी भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत.

रविवारी रात्रीपर्यंत ओडिशाच्या सहा जिल्ह्यांतून जवळपास ३९ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.

राज्य प्रशासनाकडून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

up cabinet expansion : यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये
mamata banerjee : ममता बॅनर्जींची जीभ घसरली! मृत भाजप नेत्याची तुलना केली सडलेल्या कुत्र्याशीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: