IPL 2021 Points Table: विश्वास बसणार नाही; मुंबई इंडियन्ससोबत २०१८ नंतर प्रथमच असे झाले


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर अखेरच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सवर ५४ धावांनी मोठा विजय मिळवला. गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स तितक्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबी १२ गुणांसह तिसऱ्या तर केकेआर चौथ्या स्थानावर आहे.

वाचा- Harshal Patel Hattrick Video: मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेणारा हर्षल पटेल; पाहा व्हिडिओ

गुणतक्त्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सचे स्थान होय. आयपीएलचे पाच वेळा विजेतेपद मिळवणारा आणि गेल्या दोन हंगामाचे जेतेपद मिळवलेला संघ यावेळी चक्क सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने १० लढतीत फक्त ४ मध्ये विजय मिळवला आहे. त्याचे आठ गुण असून नेट रनरेट वजा ०.५५१ इतके आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ नेहमी अव्वल चार मध्ये असतो. पण यावेळी ते तळाला पोहोचले आहे. याआधी मुंबईचा संघ ७व्या क्रमांकावर २०१८ साली होता. तेव्हा त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. तेव्हा साखळी फेरीतली सर्व लढती झाल्यानंतर मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२० मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले.

वाचा- अखेरच्या चेंडूवर पराभव; चॅम्पियन कर्णधाराचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर

आयपीएलचा १४वा हंगाम सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स जेतेपदाचे फेव्हरेट होते. पण पहिल्या सत्रात त्यांची कामगिरी खराब झाली. करोनामुळे मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली. तरी देखील मुंबईला लय सापडली नाही. आता मुंबईच्या चार लढती शिल्लक आहेत. त्यात विजय मिळवणे आवश्यक असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: