अफगाणिस्तान: तालिबानी राजवटीचा आदेश; दाढी कापण्यावर बंदी


काबूल: अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तालिबान उदारमतवादी झाल्याचे चित्र नेत्यांकडून रंगवण्यात येत असताना दुसरीकडे वस्तुस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. तालिबानींनी अफगाणिस्तानमधील हेलमंद प्रांतात दाढी कापण्यावर बंदी घातली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हेलमंद प्रांतात स्टायलिश हेअरस्टाइल आणि दाढी कापण्यावर बंदी घातली आहे. तालिबानच्या इस्लामिक ओरिएंटेशन मंत्रालयाने केशकर्तनकारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे आदेश दिले आहेत.

द फ्रंटिअर पोस्टच्या वृत्तानुसार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हेलमंद प्रांताची राजधानी लष्कर गाहमध्ये केशकर्तनकारांना स्टायलिश हेअरकट आणि दाढी कापण्यास बंदीचे आदेश दिले आहेत. हे आदेश सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले आहेत. त्याशिवाय, सलूनमध्ये संगीत अथवा धार्मिक गीतांवरही बंदी घातली आहे. या आदेशानंतर तालिबान आपल्या कट्टरतावादी भूमिकेकडे वळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींचे भाष्य, म्हणाले…

तालिबानने १९९६ ते २००१ दरम्यान आपल्या राजवटीत असेच नियम लागू केले होते. हे नियम तालिबानी शरियावर आधारित असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या हेरात शहराच्या मुख्य चौकात तालिबानने एक मृतदेह क्रेनला लटकवला होता.

‘या’ आघाडीत भारताचा समावेश करण्यास अमेरिकेचा नकार
तालिबानने अपहरणाच्या आरोपात चौघांना अटक केली होती. त्यानंतर या चौघांनाही ठार करण्यात आले. त्यातील तिघांचे मृतदेह शहरातील अन्य चौकांमध्ये नेण्यात आले. तर, एकाचा मृतदेह मुख्य चौकात लटकवण्यात आला असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: