Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे का? जाणून घ्या सर्वकाही


दुबई: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ एक दोन नव्हे तर पाच विजेतेपद मिळवणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. एवढच नाही तर या वर्षी मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. त्यांनी २०१९ आणि २०२० अशी सलग दोन विजेतेपद मिळवली आहेत. चेन्नई सुपर किंग्जनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ आहे. आयपीएलचे १४वे सत्र सुरू झाले तेव्हा मुंबई इंडियन्स जेतेपदासाठी फेव्हरेट होता. पण आता १० लढतीनंतर चित्र थोड धक्कादायक आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा रविवार झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ५४ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्स गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर फेकला गेलाय. मुंबईचा १० सामन्यात ४ विजय आणि ६ पराभवासह ८ गुण झाले आहेत. त्याचे नेट रनरेट वजा ०.५५१ इतके आहे.

आता साखळी फेरीत मुंबई इंडियन्सच्या चार लढती शिल्लक आहेत. या चार लढतीत मुंबईने विजय मिळवल्यास त्याचे १६ गुण होऊ शकतील आणि प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पण मुंबईसाठी आता करो वा मरो अशी परिस्थिती झाली आहे. गुणतक्त्यात सध्या चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांचे १६ गुण झाले आहे. त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे. १६ गुण मिळून प्ले ऑफमध्ये संघ पोहोचला नाही असे आजवर कधी झाले नाही.

मुंबई इंडिन्सच्या शिल्लक लढती

२८ सप्टेंबर- विरुद्ध पंजाब किंग्ज, अबुधाबी
२ ऑक्टोबर- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारजाह
५ ऑक्टोबर- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शारजाह
८ ऑक्टोबर- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अबुधाबी

वरील चार संघाविरुद्ध या हंगामात मुंबईने दोन विरुद्ध विजय तर दोन विरुद्ध पराभव स्विकारला आहे. मुंबईने राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध विजय मिळवाल आहे. तर दिल्ली आणि पंजाबा विरुद्ध त्यांचा पराभव झाला होता.

सध्या गुणतक्त्यात पंजाब चार विजयासह ५व्या तर दिल्ली १६ गुणांसह दुसऱ्या तर राजस्थान सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादचा संघ तळाला असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मुंबईने शिल्लक चार लढतीत विजय मिळवला तर अव्वल स्थानमध्ये त्यांना सहज स्थान मिळेल. पण चार पैकी १ पराभव आणि ३ विजय मिळाला तर त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: