bharat bandh : ‘हा भारत बंद तालिबानी, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान करणारा’
BKU चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदवर निशाणा साधत हा तालिबानी बंद असल्याचं भानु प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत स्वतःला शेतकरी नेता म्हणवतात आणि नंतर भारत बंदची घोषणा करतात. मात्र, यामुळे अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांवर परिणाम होतो. याचा कोणाला फायदा होईल? अशा प्रकारचे आंदोलनं सुरू ठेवून ते तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, अशी टीका भानु प्रताप यांनी केली. कोणीही भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये आणि त्याला समर्थन देऊ नये. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या अशा संघटनांना दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, अशी मागणी भानु प्रताप यांनी केली.
VIDEO: आंदोलनात घुसू पाहणाऱ्या काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
भारतीय किसान युनियन भानु गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांचा राकेश टिकैत यांच्यावर हल्ला सुरूच आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व करत आहेत ते राकेश टिकैत ठग आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस सरकारकडून निधी पुरवला जात असल्याचा आरोपही भानू प्रताप सिंह यांनी केलाय.
LIVE: ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर तणाव, सुरक्षेत वाढ
दिल्लीच्या सिंघू सीमा, गाझीपूर सीमा, टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या संघटना काँग्रेसने विकत घेतल्या आणि काँग्रेसने पाठवलेल्या होत्या. काँग्रेस त्यांना आर्थिक मदत करत होती. याची माहिती आम्हाला २६ जानेवारीलाच मिळाली होती. दिल्लीत त्यांनी २६ जानेवारीला पोलिसांवर हल्ला केला आणि लाल किल्ल्यावर दुसरा ध्वज फडकवला. त्याच दिवशी आम्ही आमचा पाठिंबा काढून घेतला आणि आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि आंदोलन संपवून परत आलो, असं सांगत भानू प्रताप सिंह यांनी यापूर्वी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला होता.