नोकरदारांसाठी खुशखबर! आता १ वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युइटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती


नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील कामगार सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच चार नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. याबाबतची लेखी माहिती कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली आहे. अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहितांना संमती दिली आहे. यानंतर लवकरच केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते.

नवीन कामगार संहितेत नियम बदलणार
नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटी यांच्यात बदल होणार आहेत. या अंतर्गत कामाचे तास आणि आठवड्याचे नियम बदलण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटीसाठी कोणत्याही संस्थेत ५ वर्षे सतत काम करण्याची सक्ती राहणार नाही. सरकारने अद्याप त्याची घोषणा केलेली नाही, परंतु नवीन कामगार कायदा लागू होताच हा नियम लागू होईल.

बँका नव्हे आता रिझर्व्ह बँकच देणार ग्राहकांना झटका; UPI पेमेंटवर लवकरच मोठा निर्णय

किती ग्रॅच्युइटी मिळते?
सध्या ग्रॅच्युइटीच्या नियमानुसार कोणत्याही संस्थेत ५ वर्षे पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटी दिली जाते. या अंतर्गत ग्रॅच्युइटीची गणना त्या महिन्यातील तुमच्या पगाराच्या आधारावर केली जाते, ज्यादिवशी तुम्ही पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनी सोडता. उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याने १० वर्षे कंपनीत काम केले आणि शेवटच्या महिन्यात त्याच्या खात्यात ५० हजार रुपये आले. आता जर त्याचा मूळ पगार २० हजार रुपये असेल तर ६ हजार रुपये हा महागाई भत्ता आहे. त्यानंतर त्याची ग्रॅच्युइटी २६ हजाराच्या (मूलभूत आणि महागाई भत्ता) आधारे मोजली जाईल.

३१ ऑगस्टपूर्वी ‘ही’ महत्त्वाची कामे करा, नाहीतर बसेल भुर्दंड

ग्रॅच्युइटीमध्ये कामाचे दिवस २६ मानले जातात त्यानुसार त्याचे गणित पाहूया…
२६,००० / २६ म्हणजे एका दिवसासाठी १,००० रुपये
१५X१,००० = १५,०००
आता जर कर्मचाऱ्याने १५ वर्षे काम केले असेल तर त्याला एकूण १५X१५,००० = ७५,००० रुपये ग्रॅच्युइटी मिळतील.

प्रवाशांनो लक्ष द्या! DGCA ने दिलीय सक्त ताकीद, विमान प्रवासात मास्क घाला नाहीतर…

सामाजिक सुरक्षा विधेयकात ग्रॅच्युइटीचा उल्लेख
४ लेबर कोडमध्ये सामाजिक सुरक्षा विधेयक, २०२० च्या अध्याय ५ मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमाविषयी माहिती देण्यात आली आहे. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटींची पूर्तता केली, तर त्याला विहित सूत्रानुसार हमीसह ग्रॅच्युइटी दिली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कापला जातो आणि मोठा भाग दिला जातो.

१ वर्षाच्या नोकरीवरही ग्रॅच्युइटी?
लोकसभेत दाखल केलेल्या मसुद्याच्या प्रतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष काम केले तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल. सरकारने ही व्यवस्था निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी केली आहे. जर एखादी व्यक्ती एका कंपनीसोबत एका ठराविक कालावधीसाठी करारावर काम करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल. याशिवाय ग्रॅच्युइटी कायदा २०२० चा लाभ केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: