मैदानाबाहेरही दिपक चहर ठरतोय हिरो, झिम्बाब्वेतील गोपिकांबरोबरचा व्हिडिओ झाला व्हायरल….


हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दीपक चहर हा भारतीय संघासाठी नायक ठरला. पण मैदानाबाहेरही दीपकच हिरो ठरत असल्याचे पाहायला मिळाले. दीपकची जादू फक्त भारतात नाही तर झिम्बाब्वेमध्येही आहे. कारण पहिला सामना झाल्यावर झिम्बाब्वेतील गोपिकांनी थेट दीपकला गाठले. यावेळी दीपक आणि या गोपिकांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


आयपीएलपूर्वी दुखापत झाली होती….
दीपकला आयपीएलपूर्वीच दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. त्यानंतर दीपकने लग्न केलं, त्यावेळी तो भारताच्या संघात पुनरागमन उशिरा करेल, असे सर्वांना वाटत होते. पण दीपक त्यानंतर काही वेळातच संघात परतला आणि पहिल्या सामन्यात हिरो ठरला. पण दीपकसाठी ही गोष्ट का शक्य होऊ शकली, याचे कारणही आता समोर आले आहे. संघात पुनरागमन करत असताना प्रत्येक खेळाडूसाठी एक महत्वाची गोष्ट ठरते आणि ती म्हणजे फिटनेस. दुखापत आणि त्यानंतर लग्न होऊनही दीपक हा जेव्हा मैदानात परतला तेव्हा तो चांगलाच फिट होता आणि हाच फायदा त्याला यावेळी झाला.

दीपकने पहिल्याच सामन्यात तीन बळी मिळवत आपण संघासाठी किती फायदेशीर ठरू शकतो, हे त्याने दाखवून दिले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दीपक हा स्विंग गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. पुनरागमन करत असताना दीपकने चेंडू चांगले स्विंग केले, त्याचबरोबर त्याचा टप्पा आणि दिशा महत्वाची होती. त्याचबरोबर दीपक यावेळी दोन्ही स्विंग करत असल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत असल्याचा चांगला फायदा यावेळी दीपकला झाला आणि त्याला तीन विकेट्स मिळवता आल्या. एखादा खेळाडू जेव्हा संघात पुनरागमन करतो तेव्हा सर्वांत महत्वाची ठरते ती त्याची सुरुवात. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पहिलेच षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. ही जबाबदारी त्याने चोख बजावली. पहिल्या काही षटकांमध्ये त्याला यश मिळाले नाही. पण यामुळे तो खचून गेला नाही. आपल्याला यश मिळणार, ही आशा त्याने कायम ठेवली आणि आपल्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे त्याला हे यश मिळाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: