आरोग्यसेवा क्षेत्राला पत पुरवठा; कोटक महिंद्रा बॅंक देणार आरोग्यविषयक गरजांसाठी कर्ज


हायलाइट्स:

  • कोटक महिंद्रा बँकेचा हेल्थकेअर फायनान्सिंग मध्ये प्रवेश
  • आरोग्य देखभाल व्यवस्थेच्या आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण पर्याय श्रेणी
  • विमा प्रवेश आणि वैद्यकीय पर्यटनात वृद्धी

मुंबई : आरोग्य सेवा क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करण्याकरिता कोटक महिंद्रा बँकेने (केएमबीएल) गरजांनुरूप आणि सर्व समावेशक आरोग्य देखभाल पर्याय सादर केले आहेत. त्यात आरोग्य देखभाल पायाभूत कर्ज, वैद्यकीय साहित्य वित्तसाह्य आणि असुरक्षित आरोग्य देखभाल विमा लॉन्च करण्यात येणार आहे. आहे आणि यामुळे, प्रयोगशाळा, रोग-निदान केंद्रे, नर्सिंग होम, दवाखाने, डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य निर्मातदार आणि विक्रेते अशा आरोग्य देखभाल व्यवस्थेतील प्रमुख घटकांना सेवा उपलब्ध होतील.

बिग बँंक फाॅर्म्युल्याचे अर्थमंत्री सितारामन यांनी केलं समर्थन म्हणाल्या…
केएमबीएल सर्व प्रमुख सहयोगींसाठी आकर्षक व्याज दरात व्यापक प्रस्तावांचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात देत आहे. त्यामध्ये ५० लाखांपर्यंतचे कर्ज त्वरित मंजूर व्हावे म्हणून नाविन्यपूर्ण कर्ज पुरवठा जसे की इन्स्टा प्रोग्रामची सोय असेल. आगामी काही वर्षांमध्ये भारतीय आरोग्य देखभाल उद्योग क्षेत्र भक्कम वृद्धीची नोंद करेल. सरकारने सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा देशभरात उपलब्ध करून देण्याकरिता अधिक लक्ष केंद्रित केल्याने आरोग्य देखभाल यातील वाढत्या गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचप्रमाणे, वैद्यकीय पर्यटनाव्यतिरिक्त, वाढते विमा कवच आणि स्वास्थ्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य देखभालीच्या दिशेने होणारे महत्वपूर्ण बदल, हे सर्व उद्योग क्षेत्राच्या वेगवान दीर्घकालीन वृद्धीचे निर्देशक ठरतात.

दरवाढीचा दणका ; चार दिवसांत तिसऱ्यांदा डिझेल महागले, हा आहे आजचा दर
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष आणि प्रमुख – बिझनेस बँकिंग ॲसेट्स सुनील दागा म्हणाले की, “आगामी ३ ते ५ वर्षे आणि त्यापुढे आरोग्य देखभाल हे प्राधान्य क्षेत्र ठरेल यात वादच नाही. महामारीने या क्षेत्राचे महत्त्व आणि देशाच्या आरोग्य देखभाल पायाभूत सुविधांची क्षमता आणि गुणवत्ता यांच्याशी निगडित सुधारणांकरिता वाढीव खर्च आणि गुंतवणुकींची गरज अधोरेखित करण्याचे काम केलेले आहेच. त्यात भर म्हणून ग्राहकांची आरोग्य आणि स्वास्थ्याच्या दिशेने वाढती सजगतादेखील आपण पाहत आहोत.”

पडझड थांबली ; जाणून घ्या आज सोने-चांदी किती रुपयांनी महागले
“हे क्षेत्र महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे आणि संपूर्ण पुरवठा साखळीला ग्राहक गरजांनुरूप आणि वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणीकरिता निधी पर्याय उपलब्ध करून देण्याची हीच योग्य वेळ असण्यावर आमचा विश्वास आहे. कोटकचे आरोग्य देखभाल वित्त साह्य भारतीय आरोग्य देखभाल क्षेत्राच्या वाढीला साह्य करेल,” असे ही सुनील पुढे म्हणाले.

केएमबीएलद्वारे आरोग्य देखभाल वित्त पर्यायांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देण्यात येईल:
– नवीन आणि रिफरबिश्ड (पुन्हा वापरण्यायोग्य) वैद्यकीय उपकरणांकरिता वित्त साह्य – निर्मातादार/ अधिकृत विक्रेत्यांकडून वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीकरिता
– खेळती भांडवल कर्जे – व्यवसायाच्या रोख तरलतेच्या गरजांच्या व्यवस्थापनाकरिता
– आरोग्य देखभाल पायाभूत सुविधा कर्जे – वैद्यकीय सुविधा, रुग्णालये आणि दवाखान्यांचे अद्ययावतीकरण/ नूतनीकरण याकरिता
– नवीन रुग्णालये, दवाखाने आणि निदान केंद्रे स्थापन करणे किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी
– असुरक्षित डॉक्टर कर्जे आणि लोन अगेन्स्ट रिसीवेबल्स – आरोग्य देखभाल संस्था आणि वैयक्तिक डॉक्टर यांना व्यवसाय विस्ताराकरिता
– इन्स्टा प्रोग्राम –किमान दस्तावेजासह ५० लाखांपर्यंतच्या झटपट कर्जांना मंजुरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: