झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात दोन बदल, पाहा कोणाला संधी…


हरारे : भारताने पहिल्या वनडेमध्ये झिम्बाब्वेवर दमदार विजय साकारला. पण आता दुसरा सामना जिंकत भारताला मालिका विजय साकारता येऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वाचा-युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने आज पंजाब कोर्टात घटस्फोट घेतला का? जाणून घ्या फॅक्ट चेक

पहिला बदल…
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. कुलदीपने यावेळी १० षटके गोलंदाजी केली, पण त्याला एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात येऊ शकते. कुलदीपच्या जागी भारतीय संघात शाहबाझ अहमद या युवा खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. अहमदचा हा पहिलाच सामना ठरू शकतो. त्यामुळे अहमदला यावेळी पदार्पणाची संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

वाचा-भारत आणि झिम्बाब्वेचे वनडे सामने नेमके किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ

दुसरा बदल
पहिल्या वनडेमध्ये मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली होती. पण सिराजला यावेळी छाप पाडता आली नाही. सिराजने या सामन्यात एक विकेट मिळवला असला तरी त्याच्याकडून जास्त धावा गेल्या होत्या. सिजराला यावेळी १० षटके पूर्णही करायला दिली नव्हती. त्यामुळे आता दुसऱ्या वनडेसाठी सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. सिराजच्या जागी भारतीय संघात आवेश खान किंवा शार्दुल ठाकूर यांना संधी दिली जाऊ शकते. पण या दोघांमध्ये शार्दुल ठाकूरचे पारडे जड दिसत आहे. कारण शार्दुल हा वेगवान गोलंदाजी तर करतोच, पण तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते आणि त्याला संधी मिळू शकते. शार्दुल संघात आला तर भारताची फलंदाजीही अधिक भक्कम होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जर सिराजला संघातून बाहेर करण्यात आले तर त्यासाठी शार्दुल हा सर्वोत्तम पर्याय भारतीय संघासमोर असेल.

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: