आभासी चलने तेजीत ; बिटकॉइनसहा या डिजिटल करन्सीच्या किमतीत झाली वाढ


हायलाइट्स:

  • डिजिटल करन्सी बेकायदा असल्याची भूमिका चीनने घेतल्यानंतर झालेल्या पडझडीतून क्रिप्टो करन्सीचा बाजार आता सावरला आहे.
  • आज सोमवारी बिटकॉइनसह सर्वच प्रमुख डिजिटल करन्सीच्या किमतीत आज १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
  • टॉप १० डिजिटल करन्सीमध्ये इथेरियमचा भाव १०.३० टक्क्यांनी वधारला.

मुंबई : डिजिटल करन्सी बेकायदा असल्याची भूमिका चीनने घेतल्यानंतर झालेल्या पडझडीतून क्रिप्टो करन्सीचा बाजार आता सावरला आहे. आज सोमवारी बिटकॉइनसह सर्वच प्रमुख डिजिटल करन्सीच्या किमतीत आज १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

तेजी कायम ; शेअर बाजारात सेन्सेक्स – निफ्टीची घोडदौड सुरूच
आज सोमवारी टॉप १० डिजिटल करन्सीमध्ये इथेरियमचा भाव १०.३० टक्क्यांनी वधारला. त्याखालोखाल सोलाना, XRP आणि बिटकॉइनच्या किमतीत ४ ते ७ टक्के वाढ झाली. डिजिटल करन्सी बेकायदा असल्याची भूमिका चीनने घेतल्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी मोठी पडझड झाली होती.

प्राप्तिकर विभागाचे छापे; राज्यातील स्टील उद्योगावर कारवाई, ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता
बिटकॉइनच्या किमतीत ४.६६ टक्के वाढ झाली आणि त्याचा भाव ४४०१८ डॉलरपर्यंत वाढला. यापूर्वी एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. त्याच दिशेने आता बिटकॉइनची वाटचाल सुरु आहे.आज इथेरियमच्या किमतीत १०.३० टक्क्याची वाढ झाली आहे. एका इथेरियमचा भाव ३१२७.७६ डॉलर इतका वाढला आहे. डोजेकॉइनचा भाव ०.२० डॉलर असून त्यात १.५६ टक्के वाढ झाली आहे.

एका XRP चा भाव ०.९६ डॉलर इतका आहे. त्यात ५.१७ टक्के वाढ झाली आहे. आज कार्डानोचा भाव २.२५ डॉलर इतका असून त्यात ०.९८ टक्के वाढ झाली आहे. पोलकॅडोटच्या एका कॉइनचा भाव २९.५६ डॉलर इतका आहे. तिथेरचा भाव १ डॉलरवर स्थिर आहे. सोलानाच्या किमतीत आज ६.९१ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव १३८.८० डॉलर झाला आहे. आज Binance Coin च्या किमतीत ३.८७ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव ३५२.८७ डॉलर इतका वाढला आहे. जागतिक क्रिप्टो करन्सीजची उलाढाल २.३७ लाख कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. यात बिटकॉइनचा जवळपास ४१.७६ टक्के वाटा आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: