bull race was organized: बंदी असतानाही बैलांच्या चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन; प्रकरण आले अंगलट
हायलाइट्स:
- राधानगरी तालुक्यातील केळोशी येथे बैलांच्या चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन.
- ही शर्यत पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी केली गर्दी.
- बैलांच्या शर्यती घेण्यास सरकारची बंदी असतानाही ती आयोजित केल्याने शेतकरी व युवक मंडळाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.
जिल्ह्यात करोनाचा विळखा जरा सैल होताच पुन्हा एकदा गर्दीच्या कार्यक्रमांना ऊत येत आहे. याचाच एक भाग म्हणून राधानगरी तालुक्यातील केळोशी येथील एका मंडळाने बैलांची चिखल गुठ्रठा शर्यत आयोजीत केली आणि त्याला शेकडो ग्रामस्थांची गर्दी झाली. बैलांच्या शर्यती घेण्यास सरकारची बंदी असतानाही ती आयोजित केल्याने शेतकरी व युवक मंडळाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला. यामुळे युवकांची हौस चांगलीच अंगलट आली आहे. (despite the ban a bull race was organized in kolhapur district)
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम करण्यास सरकारने बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर करोना संसर्गाने घरात बसून कंटाळलेल्या धामोड तुळशी परिसरातील नागरिकांनी चिखल गुठ्रठा स्पर्धेचे रविवारी आयोजन केले. शर्यतीसाठी गेले दहा दिवस चिखल वाफा तयार करणे,पाणी उपलब्ध करणे अशी कामे सुरू केली. स्पर्धेची माहिती तुळशी ,धामणी नदीच्या तीरावरील गावातून देण्यात आली.राधानगरी ,करवीर ,पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्याच्या सीमा रेषेच्या टापूतील बैल शर्यतीच्या बघ्यांची प्रचंड गर्दी झाली.
क्लिक करा आणि वाचा- अण्णांच्या मदतीला आता माजी सैनिकांची फौज; जन आंदोलन होणार तीव्र
स्पर्धेतील विजेत्या बैल मालकांनी सुद्धा जल्लोषात सहभाग नोंदवला. पण मुळात अशा स्पर्धेच्या आयोजनास बंदी आहे. बैलगाडी, घोडीगाडी शर्यतीवर बंदी असतानाही या गावातील शेतकरी व युवक मंडळाने ही स्पर्धा घेतली. ‘येथे कोण पोलिस बघायला येतो’ असे म्हणत त्यांनी स्पर्धा घेतली. स्पर्धा पहाण्यास शेकडो लोकांचा जमाव तेथे आला. सर्वांनी शर्यतीचा आनंद लुटला. अनेकांनी या शर्यतीचे मोबाइलवर चित्रण केले. फोटो काढले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटी रुपये?; आमदार आशीष शेलारांचा सवाल
सोमवारी हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याची दखल घेत राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस सकाळी केळोशी गावात दाखल झाले. त्यांनी आयोजकांचा शोध सुरू केला. युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी भंबेरी उडाली. सर्वांनाच राधानगरी येथे पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. आज दिवसभर माफीनामा ,समेट सुरू होते. उत्साहाच्या भरात केलेले स्पर्धेचे आयोजन चांगलेच अंगलट आले आहे.स्पर्धा आयोजक शेतकरी आणि कांही युवक यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शर्यत पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यांनी शर्यतीचा मनमुराद आनंद लुटता आला पण आयोजकांचे धाबे दणाणले आहेत. राधानगरी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
क्लिक करा आणि वाचा- ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले