bhabanipur election : भवानीपूर घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल; पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
आम्ही निवडणुकीचा प्रचारच करू शकत नाही, मग पोटनिवडणूक घेण्यात काय अर्थ आहे. निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूकच रद्द करावी, अशी मागणी दिलीप घोष यांनी केली आहे. भवानीपूरमध्ये निवडणूक प्रचार करत असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला शिवीगाळ केला. आपण त्यावेळी एका लसीकरण केंद्रात होतो. त्यावेली काहिंनी आपल्याला घेरलं आणि धक्काबुक्की केली. आमच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाणही केली. आपल्यावर हल्ला झाला. आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि हल्लेखोरांना पिटाळण्यासाठी पिस्तुल काढलं, असं घोष यांनी सांगितलं.
दिलीप घोष यांच्या आरोपांना तृणमूल काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. दिवसाढवळ्या नागरिकांना पिस्तुल दाखवण्याची हिंमत कशी झाली? ज्यांचे समर्थन करत नाही त्यांना विरोध करण्याचा नागरिकांना अधिकार नाही का? मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे आणि हे लज्जास्पद आहे. भवानीपूरच्या नागरिकांच्या सुरक्षेशी केलेली ही तडजोड आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केली आहे.
Bhawanipur Bypoll 2021: तृणमूलकडून दिलीप घोष यांच्यावर हल्ला, भाजपचा दावा
तर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. राज्यातील स्थिती गंभीर आहे आणि निवडणूक आयोग काहीच करत नाहीत. आमच्या पक्षाचं एक शिष्टमंडळ दिल्लीत निवडणूक आयोगाला भेटलं आणि राज्यातही आमच्या शिष्टमंडळाने आयोगाची अनेकदा भेट घेतली. पण निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही, असं म्हणत सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं.
bharat bandh : ‘भारत बंदने नागरिकांना त्रास, पण एक दिवस शेतकऱ्यांच्या नावे समजून विसरून जा’