akash prime : आकाक्ष प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूचे हल्ले हवेतच नष्ट करणार


नवी दिल्लीः आकाश क्षेपणास्त्राची अद्ययावत अवृत्ती ‘आकाश प्राइम’ या नव्या क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूरजवळील एकात्मिक चाचणी रेंजवर (ITR) ही यशस्वी चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्रात सुधारणा केल्यानंतर पहिल्या उड्डाण चाचणीमध्ये शत्रूच्या विमानाची नक्कल करणाऱ्या मानवरहित हवाई लक्ष्याला रोखले आणि नष्ट केले, अशी माहिती डीआरडीओने दिली.

या क्षेपणास्त्राचा उपयोग हा भारतीय हवाई दलाला शत्रूच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी होईल. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने तयार केले आहे. या क्षेपणास्त्राची लांबी ५६० सेंटीमीटर आणि रुंदी ३५ सेंटीमीटर आहे. या क्षेपणास्त्रात ६० किलो वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश क्षेपणास्त्र हे वेगवान आणि धावत्या वाहनांच्या ताफ्याची सुरक्षा करण्यास सक्षम आहे.

Ayushman Bharat Digital Mission : आधारच्या धर्तीवर आता हेल्थ कार्ड, मिळणार अनेक फायदे, काय आहे यो

आकाश प्रणाली प्रामुख्याने हवाई संरक्षण करण्यासाठी (पृष्ठभागावरुन हवेत हल्ला करणारे) तयार केली गेली आहे. या क्षेपणास्त्रात अनेक अत्याधुनिक उपकरणे जोडली गेली आहेत आणि हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. आजच्या काळाची मागणी लक्षात घेता हे क्षेपणास्त्र पूर्णपणे सक्षम आहे. या चाचणीच्या वेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि अंतरिम चाचणी परिषदमधील (आयटीआर) वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांची एक टीम उपस्थित होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: